लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असून जिल्हा परिषदेतील १० ते १५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे अशा स्थितीत जि.प.शिक्षण विभागाने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा गुरूवारी (दि.१०) रोजी आयोजित केला होता. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते. शिक्षकांमध्ये सुध्दा यावरुन नाराजीचा सूर होता. अखेर शिक्षणाधिकाऱ्यांनी याची दखल घेत गुरूवारी आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा रद्द केला आहे. त्यासंबंधिचे पत्र सुध्दा शिक्षण विभागाने काढले आहे.जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्याधिकाºयांसह काही अधिकारी आणि कर्मचारी कोरोना बाधित आढळले आहे. येथील बाधितांची संख्या दररोज वाढत आहे. यामुळे कार्यरत कर्मचाºयांमध्ये सुध्दा भीतीचे वातावरण आहे. मात्र अशा स्थितीत जि.प.शिक्षण विभागाने सन २०१९-२० च्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन गुरूवारी जि.प.च्या सभागृहात केले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यासाठी लगीन घाई करण्याची गरज काय असा सवाल शिक्षकांकडून केला जात होता. यावरुन टीका सुध्दा सुरू झाली होती.एका शिक्षिकेने या आदर्श शिक्षक पुरस्कारावर आक्षेप घेत दुजाभाव करुन देण्यात आल्याचा आरोप केला होता. लोकमतने बुधवारच्या अंकात पुरस्कार वितरणावर आरोपाचे सावट या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर शिक्षण विभागाने कोविडच्या प्रादुर्भावामुळे गुरूवारी आयोजित पुरस्कार वितरण सोहळा रद्द केला. तसेच हा कार्यक्रम कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर घेण्यात येईल असे म्हटले आहे. आता केवळ आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नाव जाहीर करण्यात येणार आहे.जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार सन २०१९-२० च्या शैक्षणिक सत्रात सामाजिक अभिलेखावरुन तसेच शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार आणि प्रत्यक्ष प्रमाणपत्र तपासून व गुणदान करुन गुण श्रेणीतील अव्वल असलेल्या शिक्षकांची समितीने या पुरस्कारासाठी निवड केली आहे. यात कसलाही दुजाभाव करण्यात आलेला नाही.- राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी प्राथमिक जि.प.गोंदिया
आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 5:00 AM
एका शिक्षिकेने या आदर्श शिक्षक पुरस्कारावर आक्षेप घेत दुजाभाव करुन देण्यात आल्याचा आरोप केला होता. लोकमतने बुधवारच्या अंकात पुरस्कार वितरणावर आरोपाचे सावट या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर शिक्षण विभागाने कोविडच्या प्रादुर्भावामुळे गुरूवारी आयोजित पुरस्कार वितरण सोहळा रद्द केला. तसेच हा कार्यक्रम कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर घेण्यात येईल असे म्हटले आहे.
ठळक मुद्देकोरोनाचा प्रादुर्भाव : शिक्षण विभागाने काढले पत्र