शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

डिजि लॉकरमधील ओळखपत्र ग्राह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:09 AM

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे आपल्या प्रवाशांच्या सुविधांसाठी शासनाच्या डिजिटल लॉकरमध्ये अपलोड करण्यात आलेल्या आधारकार्ड व ड्रायव्हिंग लायसंसची साफ्ट कॉपी ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरत आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान ओळखपत्र नसल्यास प्रवाशांची आता फजिती होणार नाही.

ठळक मुद्देरेल्वे प्रशासनाचा निर्णय : आधारकार्ड व ड्रायव्हींग लायसंसचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे आपल्या प्रवाशांच्या सुविधांसाठी शासनाच्या डिजिटल लॉकरमध्ये अपलोड करण्यात आलेल्या आधारकार्ड व ड्रायव्हिंग लायसंसची साफ्ट कॉपी ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरत आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान ओळखपत्र नसल्यास प्रवाशांची आता फजिती होणार नाही.रेल्वेने प्रवाशांच्या डिजि लॉकरमध्ये उपलब्ध आधारकार्ड व ड्रायव्हिंग लायसंसच्या डिजिटल कॉपीला ओळखपत्राचा पुरावा (आयडी प्रुफ) म्हणून रेल्वे प्रशासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार जर प्रवाशाने आपल्या डिजि लॉकर अकाऊंटमध्ये ‘इश्युड सेक्शन’मध्ये अपलोड केलेले आधारकार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसंस दाखविले तर ते मान्य ओळखपत्र म्हणून स्वीकार करण्यात येत आहे.अनेकदा अशी विषम परिस्थिती निर्माण होते की जेव्हा ‘ओरिजिनल आयडी प्रुफ’ दाखविण्याची गरज भासते. परंतु नेमक्या त्याचवेळी दाखविण्यासाठी आपल्याकडे काहीही नसते. अशा स्थितीतून वाचण्यासाठी ही सुविधा विशेष लाभदायक ठरणार आहे. अशाप्रकारे एखाद्याकडे प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारचे मूळ ओळखपत्र नसल्यास, डिजि लॉकरमध्ये उपलब्ध आधारकार्ड व ड्रायव्हिंग लायसंसची डिजिटल कॉपी ओळखपत्र म्हणून प्रवासी सादर करू शकतो.आधारकार्ड व ड्रायव्हिंग लॉयसंसला प्रवासादरम्यान कोणत्याही व्यक्तीचे कायदेशीर ओळखपत्र मानले जाईल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.जर प्रवासी आपल्या डिजि लॉकरच्या खात्यात लॉग-इन करून जारी दस्तावेज अनुभागातून आधारकार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसेंस दाखवेल तर त्या ओळखपत्राला वैध प्रमाणपत्र समजले जाणार आहे. परंतु प्रवासी जर स्वत:च्या द्वारे सॉफ्ट फार्ममध्ये जसे मोबाईल, मेल, लॅपटॉप आदींमध्ये अपलोड केलेले दस्तावेज ओळखपत्र म्हणून दाखवेल तर त्यावेळी त्यांना वैध प्रमाणपत्र म्हणून स्वीकार केले जाणार नाही, असेही रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.काय आहे डिजि लॉकर?भारत सरकारने नागरिकांना क्लाऊड आधारित या प्लॅटफॉर्मवर आपले काही अत्यंत महत्वपूर्ण दस्तावेज सुरक्षित ठेवण्याची सुविधा दिली आहे. यालाच डिजि लॉकर म्हणतात. डिजिटल लॉकर सरकारकडून संचालित क्लॉऊड स्टोरेज सेवा आहे. जेथे लोक आपल्या निश्चित दस्तावेजांना सुरक्षित ठेवू शकतात. रेल्वेने आपल्या सर्व झोनल प्रिंसिपल चीफ कमर्शियल मॅनेजर यांना औपचारिक संदेश द्वारे डिजि लॉकरमधील आधार कार्ड व ड्रायव्हिंग लायसंस या दोन्ही दस्तावेजांना प्रवाशांचे मान्य ओळखपत्र म्हणून स्वीकार केले आहे.

टॅग्स :railwayरेल्वे