लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मांगल्याचे देवता गणरायांच्या स्थापनेला आता काही तासांचा अवधी उरला आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांची धावपळ वाढली असून तयारी पूर्ण करण्यासाठी त्यांची लगबग सुरू आहे. तर काही मोठ्या मंडळांच्या मूर्तींचे शहरात आगमन सुरू झाले आहे. विशेष म्हणजे वेळेवर मूर्तींचे आॅर्डर पूर्ण करण्यासाठी मूर्तीकारांचे रात्रीला जागून काम सुरू असून ते मूर्तींना ‘फायनल टच’ देताना दिसून येत आहेत. गुरूवारपासून (दि.१३) गणेशोत्सवाला प्रारंभ होतोय. शहरात मोठ्या प्रमाणात खाजगी व सार्वजनिक गणपतींची स्थापना केली जाते. परिणामी गणरायांचे हे १० दिवस नवचैतन्याने बहरलेले असतात. यामुळेच गोंदिया शहरातील गणेशोत्सवाची जिल्हातच काय लगतच्या छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्यांतही ख्याती आहे. मात्र आता गणरायांच्या आगमनाला काहीच तास शिल्लक असल्याने शहरात एकच गर्दी व सर्वांना लगबग दिसून येत आहे. शहरातील काही मंडळ गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे देखावे व मूर्ती या मोठ्या बजेटच्या राहत असल्याने ही सर्व कामे आटोपण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते धावपळ करीत असताना दिसून येत आहेत. विशेष म्हणजे काही मंडळांच्या मूर्ती छत्तीसगड राज्यात तयार होतात. त्यामुळे गणेश मंडळ आपल्या मूर्ती आणण्यासाठी रवाना झाले असून मूर्तींचे आगमन सुरू झाले आहे. तर मंडपांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी कारागिर दिवसरात्र एक करून कामाला लागले आहेत. गणराज येणार असल्याने महिला वर्गही घराच्या साफसफाई व डेकोरेशनला लागल्या आहे. तसेच गणरायांना १० दिवस कोणता नैवेद्य लावायचा व मोदकांच्या तयारीत व्यस्त दिसून येत आहे.विशेष म्हणजे, या सर्व लगबगीत मुर्तीकारही मागे नाही. त्यांनी घेतलेले मूर्तींचे आॅर्डर पूर्ण करण्यासाठी मूर्तीकार आपल्या परिवारासह डोळ््यात तेल घालून काम करीत आहेत. तसेच आपल्या मूर्तींची तयारी पूर्ण करवून घेण्यासाठी मंडळांचे कार्यकर्ते मूर्तीकारांकडे तळ ठोकून बसले आहेत. मूर्तीकारांचे बस्तान सध्या येथील सिव्हील लाईन्स परिसरात असल्याने सिव्हील लाईन्स परिसर आतापासूनच गजबजून गेला आहे.पुणे व जबलपूरच्या मूर्ती आल्या शहरातलगतच्या मध्यप्रदेश राज्यातील जबलपूर येथून दरवर्षी मोठ्या प्रमाणात मूर्ती विक्रीसाठी शहरात येतात. त्यानुसार यंदाही या मूर्ती शहरात आल्या आहेत. विशेष म्हणजे, पुणे येथूनही मूर्ती शहरात विक्रीसाठी आल्या आहेत. वेगवेगळ््या प्रकारच्या लहान-मोठ्या मूर्ती घेऊन विक्रेते नेहरू चौक, आंबेडकर चौक व जयस्ंतभ चौकात दिसून येत आहेत. तर मोठ्या संख्येत नागरीक या मूर्तींची खरेदी करीत असल्याने येथे गर्दी लागली आहे.साहित्यांच्या दुकानांत गर्दीगजाननाला सजविण्यासाठी लागणाऱ्या साहीत्यांच्या दुकानांनी बाजारपेठ सज्ज आहे. या दुकानांत सध्या आपल्या घरच्या मूर्तींसाठी तसेच सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींच्या साहीत्यांची खरेदी करण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी दिसून येत आहे. गणेशोत्सव काही तासांवर असल्याने सर्वच आतापासून खरेदीला लागले असून यामुळे शहर गजबजून गेले आहे.असा आहे स्थापनेचा शूभ मुहूर्तगणरायांच्या स्थापनेसाठी शूभ मुहूतार्ची गरज नसते असे म्हटले जाते. तरिही पांचांगानसार, स्थापनेसाठी सकाळी ६ ते ८ वाजता व सकाळी १०.३० ते दुपारी ३ वाजतापर्यंत त्यानंतर सायंकाळी ४.३० ते रात्री ९ वाजताचा शुभमुहूर्त असल्याचे पंडीत गोविंद शर्मा यांनी सांगीतले आहे.
मूर्तींना दिला जातोय ‘फायनल टच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 10:09 PM
मांगल्याचे देवता गणरायांच्या स्थापनेला आता काही तासांचा अवधी उरला आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांची धावपळ वाढली असून तयारी पूर्ण करण्यासाठी त्यांची लगबग सुरू आहे. तर काही मोठ्या मंडळांच्या मूर्तींचे शहरात आगमन सुरू झाले आहे.
ठळक मुद्देआज होणार गणरायांचे आगमन : गणेशोत्सव मंडळांची लगबग