लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : मागील निवडणुकीत येथील लोकांना आम्ही सत्तेवर येताच येथील एमआयडीसीमध्ये मोठा उद्योग, पालांदूर (जमी.) क्षेत्रात सिंचनाकरिता लिफ्ट इरीगेशन सुरु करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु या चार वर्षांच्या कार्यकाळात एकाही आश्वासनाची पुर्तता करण्यात आली नाही. येथील आमदार व शासनाचे बेरोजगार व शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी सहषराम कोरोटे यांनी केले.तालुक्यातील ग्राम गरारटोला येथील मंदिरासमोर गुरुवारी (दि.११) आयोजित पालांदूर (जमी.) पंचायत समिती क्षेत्रातील काँग्रेस पक्षाच्या बुथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. उद्घाटन माजी सभापती वसंत पुराम यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी सरपंच चंद्रकला कावळे, उपसरपंच नुरचंद नाईक, माजी पं.स. सदस्य सोनू नेताम, काँग्रेसचे जिल्हा प्रतिनिधी बळीराम कोटवार, कार्यकर्ता नमन गुप्ता, तारकेश्वर हरदुले, प्यारेलाल उजवणे, चुन्नीलाल भोगारे, माजी सरपंच वच्छला कोवे, सुरज मिरी, नकुल सोनवाने, महिला धुवगोंड, समाजाचे पुष्पा ओटी, धुरसिंग मडावी, पत्रकार श्रावण कवडो, धमाजी जेंगठे, रामदास थाटमुर्रे, शामलाल मडावी, अध्यक्ष हंसराज ठाकरे, बाबुराव मडावी, महाराज जगन मोहुर्ले, वासुदेव वाढई, ताराचंद चनाप, आनंद मडावी, किर्तन प्रचारी, बाबुलाल सपाटे, माजी ग्रा.पं. सदस्य रघुनाथ कोल्हे, ग्रा.पं. सदस्य बिसेन हरदुले, धन्नुकला पुराम, गौतम मिरी प्रामुख्याने उपस्थित होते.पुढे बोलताना कोरोटे यांनी, येथील एमआयडीसीमध्ये एकही उद्योग सुरु झाला नाही. त्यामुळे या भागातील अनेक बेरोजगार रोजगाराच्या शोधात शहाराकडे धाव घेत आहेत. पालांदूर (जमी.) या क्षेत्रात लिफ्ट इरिगेशन सुरु झाले नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे सिंचनाचे प्रश्न सुटलेले नाही. या तालुक्यात एखादे अॅग्रीकल्चर टुरीझम सुरु झाले असते तर या ठिकाणी विविध पीक उत्पादनांविषयी प्रशिक्षण मिळाले असते. त्यामुळे येथील शेतकरी हा व्यापारी शेतकरी बनून त्याचे जिवनमान व उत्पादनात वाढ झाली असती असे सांगीतले. यावेळी १०० बुथ कार्यकर्त्यांना बुथ परिचय कार्यकर्ता कार्ड कोरोटे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. प्रास्ताविक तंटामुक्त समिती अध्यक्ष भास्कर निकोडे यांनी मांडले. संचालन किसन चौधरी यांनी केले. आभार वासुदेव वाढई यांनी मानले.
बेरोजगार व शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 9:38 PM
मागील निवडणुकीत येथील लोकांना आम्ही सत्तेवर येताच येथील एमआयडीसीमध्ये मोठा उद्योग, पालांदूर (जमी.) क्षेत्रात सिंचनाकरिता लिफ्ट इरीगेशन सुरु करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु या चार वर्षांच्या कार्यकाळात एकाही आश्वासनाची पुर्तता करण्यात आली नाही.
ठळक मुद्देसहषराम कोरोटे : गरारटोला येथे काँग्रेस बुथ कार्यकर्त्यांचा मेळावा