शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

पलटूदेव पहाडावर अवैध खोदकाम

By admin | Published: September 25, 2016 2:22 AM

नवेगावबांध येथील पलटू देवस्थानासमोरील शासकीय पहाडावर मोठ्या प्रमाणात विनापरवागीने अवैध गिट्टी व मुरुम उत्खनन सुरू आहे.

मुरूम व गिट्टीची चोरी : शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला, तालुका प्रशासन छडा लावणार?संतोष बुकावन  अर्जुनी-मोरगावनवेगावबांध येथील पलटू देवस्थानासमोरील शासकीय पहाडावर मोठ्या प्रमाणात विनापरवागीने अवैध गिट्टी व मुरुम उत्खनन सुरू आहे. पहाडाच्या पायथ्याशी अनेक धनदांडग्यांनी अतिक्रमण करून हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. आतापर्यंत सदर खोदकाम करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे लाखो रुपयांची संपदा नष्ट होऊन पर्यावरण व वन्यप्राण्यांना धोका निर्माण झाला आहे. एवढेच नाही तर लाखो रुपयांच्या शासकीय महसुलावरही पाणी सोडले जात आहे.प्राप्त माहितीनुसार, नवेगावबांध येथे पलटू देवस्थानासमोर १२६२/१ हा मोठ्या झाडांचा जंगल असलेला शासकीय गट आहे. याचे क्षेत्रफळ १५५ हेक्टर आर एवढे आहे. लगतच व्याघ्र प्रकल्प आहे. या शासकीय जागेवर गुत्तेदारांचे साम्राज्य आहे. अनेक वर्षापासून अवैध गिट्टी उत्खनन बिनबोभाटपणे सुरु आहे. यामुळे पहाड सर्वत्र पोखरलेला दिसून येतो. कुठलीही परवानगी नसताना या ठिकाणी विविध आकाराच्या गिट्टीचे साठे दिसून येतात. पहाडीच्या पायथ्याशी काही धनदांडग्यांनी शेती तयार करून अतिक्रमण केले आहे. येथे शेतजमिनीचा उपयोग कमी, मात्र गिट्टी विक्रीचा गोरखधंदा जोरात सुरू असल्याचे दिसून येते. कधीकधी तर या ठिकाणी पाथरवटांचे जत्थेचे जत्थे दिसून येतात. एवढे असतानाही महसूल व वनविभागाचे अधिकारी मात्र मूग गिळून आहेत. यामागे मोठे ‘अर्थकारण’ दडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवेगावबांध येथे तलाठी कार्यालय आहे. एवढेच नाही तर वनविभागाच्या सहाय्यक उपवनसंरक्षकाचे कार्यालय आहे. पहाड महसूल विभागाकडे येत असला तरी त्यावरील झाडे मात्र वनविभागाने जतन करण्याची आवश्यकता असताना या दोन्ही यंत्रणांचे त्याकडे दुर्लक्ष आहे. या पहाडीलगतच नवेगावबांध व्याघ्र प्रकल्प आहे. परिसरात वन्यप्राण्यांचा संचार असतो. मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या गिट्टी उत्खनामुळे त्यांच्या अधिवास व पायथ्यांशी असलेल्या बोडीतील जलप्राशनात बाधा उत्पन्न होते. त्यामुळे प्राणी व्याघ्र प्रकल्प सोडून बाहेर स्थलांतरीत होतात. वास्तविक गिट्टी उत्खनन व शासनाला या पहाडीक्षेत्रात मिळालेला महसूल याची गोळाबेरीज केल्यास लाखो रुपयांचा शासनाचा महसूल बुडाल्याचे निदर्शनास येईल. झारीतील शुक्राचार्य कोण?अवैधपणे गिट्टी उत्खनन करुन लाखो रुपयांचा मलिदा खाणारा तो झारीतील शुक्राचार्य कोण? हा प्रश्न कायम आहे. अवैधपणे उत्खनन करुन गिट्टीचा साठा घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात केला आहे. मात्र तो कुणी खोदकाम केले ते पुढे येत नाही. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरु आहे. तो कुणीतरी गुत्तेदार असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे. एवढा मोठा प्रताप सुरु असताना स्थानिक प्रशासनाला माहिती असू नये, ही बाब शंकास्पद आहे. पलटूदेव पहाडी ही प्रशासनासाठी भ्रष्टाचाराचे कुरणच झाले आहे. या झारीतल्या शुक्राचार्याचा शोध घेणे महसूल विभागासमोर एक मोठे आव्हान आहे.-‘ लोकमत’च्या सूचनेनंतर पटवारी-अधिकारीही झाले अवाक्सदर प्रतिनिधीने शुक्रवारी गुप्त माहितीच्या आधारावर पहाड परिसर पिंजून काढला तेव्हा सारे गौडबंगाल उजेडात आले. त्यानंतर तलाठी झलके यांची भेट घेतली. या शासकीय गटाबद्दलची माहिती जाणून घेतली. तलाठ्यांनी दोन-तीन दिवसापुर्वीच या परिसराला भेट दिल्याचे सांगितले. असा कुठलाही प्रकार नसल्याचे सांगून ते मोकळे झाले. मात्र सदर प्रतिनिधीने त्यांना घटनास्थळावर नेऊन गिट्टीचे साठे दाखविताच त्यांनी डोक्यावर हात ठेवला व तहसीलदार प्रशांत घोरुडे यांना भ्रमणध्वनीवर याची माहिती दिली. त्यांनी अवैध गिट्टी साठ्याचा पंचनामा करुन जप्त करण्याचे फर्मान सोडले. हितचिंतक की शत्रू!पलटूदेव पहाडीच्या पायथ्याशी काही धनदांडग्या राजकारण्यांनी अतिक्रमण केले आहे. तिथे शेती काढली. या शेतीत जेमतेम उत्पन्न येते. मात्र खरे उत्पन्न गिट्टीचे आहे. वन्यप्राण्यांना धोका पोहोचेल यासाठी राष्ट्रीय महामार्गाला विरोध केला. म्युझिकल फाऊंटेनच्या आवाजाने व्याघ्र प्रकल्पात वन्यप्राण्यांना त्रास होईल यासाठी नवेगावबांध उद्यान परिसरात आडकाठी आणण्याचे काम केले जात आहे. पहाडावर असलेल्या वन्यप्राण्यांचे पाणवठे अतिक्रमण करुन नष्ट करण्याचे काम हीच मंडळी करीत आहे. त्यामुळे ते व्याघ्र प्रकल्पाचे हितचिंतक की शत्रू? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.वर्षभरापासून गिट्टी बाहेर?विशेष उल्लेखनीय म्हणजे हा गिट्टीसाठा कुणी केला त्याचे नाव पुढे आले नाही. त्या परिसरात असलेल्या काही लोकांनी बोंडे येथील एका इसमाने गुरुवारी (२०) दुपारपर्यंत पाथरवटांमार्फत गिट्टी काढणे व फोडण्याचे काम केल्याचे सांगितले. हा प्रकार वर्षभरापासून बिनबोभाटपणे सुरु असल्याने लाखो रुपयांची गिट्टी बाहेर गेली आहे. या गोरखधंद्यामुळे पहाड क्षेत्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. पहाडावरुन येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहासोबत माती सुद्धा खचत असल्याने मोठे नुकसान संभवते. पलटू देवस्थानासमोरुन जाणारा पांदण रस्ता सुद्धा गिट्टी तस्करांनी सोडला नाही. अगदी रस्त्याच्या कडेपासून उत्खनन झाल्याचे दृष्टीस येते. अधिक गिट्टी उत्खननामुळे काही झाडांची मुळे मुरल्याने ते कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.