ऑनलाईन लोकमतगोंदिया : तिरोडा तालुक्यातील मुरदाडा, सायटोला, महालगाव व देवरी या रेती घाटांवरुन जेसीबी व पोकलॅन मशिनचा वापर करुन मोेठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन केले जाते. मात्र या प्रकाराकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष झाले असल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असून पर्यावरणाची ऱ्हास होत आहे.या रेती घाटांवरुन नियमबाह्यपणे सुरू असलेले अवैध रेतीचे उत्खनन थांबविण्यात यावे. यासाठी गावकरी व ग्रामपंचायतने अनेकदा तहसीलदार रविंद्र चव्हाण यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती आहे. काही कंत्राटदार सर्रासपणे रेती घाटावरुन जेसीबी आणि पोकलॅन मशिनचा वापर करुन रेतीचे उत्खनन करीत आहे. नियमानुसार जेसीबी लावून रेतीचे उत्खनन करता येत नाही. यानंतरही या रेती घाटांवर पोकलॅनव्दारे रेतीचा उपसा केला जात आहे. विशेष म्हणजे रॉयल्टीपेक्षा अधिक रेतीचे उत्खनन करुन क्षमतेपेक्षा अधिक रेतीची ट्रकव्दारे वाहतुक सुरू आहे. या सर्व प्रकाराची तक्रार गावकºयांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबिले आहे. ज्या रेतीघाटावरुन रेती उत्खनन करण्याचे आदेश आहेत. त्यापेक्षाही जास्त पाच हेक्टर क्षेत्रातून रेतीचे उत्खनन केले जात आहे. महसूल विभागाचे अधिकारी गावकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करीत आहेत. यासर्व प्रकाराची माहिती पोलीस विभागाला सुध्दा आहे. मात्र त्यांचे सुध्दा याकडे दुर्लक्ष झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान या प्रकाराकडे दुर्लक्ष करणाºया अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी विष्णु नागपुरे, निरज उपवंशी, राजेश बिजेवार गावकऱ्यांनी केली आहे. अन्यथा या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.माहितीकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्षया परिसरातील गावकऱ्यांनी बुधवारी (दि.७) रेती घाटावर धडक देवून पोकलॅन आणि जेसीबीव्दारे सुरू असलेल्या रेतीच्या उत्खननाचे चित्रीकरण केले. तसेच याची माहिती तहसीलदार व महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. मात्र कुणीही घटनास्थळी पोहचले नाही. उलट मंडळ अधिकारी पंचनामा करतील ऐवढे सांगून मोकळे होण्यातच धन्यता मानली.
मुरदाडा रेतीघाटावरुन रेतीचे अवैध उत्खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 12:29 AM
तिरोडा तालुक्यातील मुरदाडा, सायटोला, महालगाव व देवरी या रेती घाटांवरुन जेसीबी व पोकलॅन मशिनचा वापर करुन मोेठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन केले जाते.
ठळक मुद्देजेसीबी व पोकलॅन मशीनचा वापर : गावकºयांच्या तक्रारीकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष