सिरपूरबांध : सिरपूरबांध येथील मनोहर सागर जलाशयात मोठ्या प्रमाणात अवैध मासेमारी सुरू आहे. शासन नियमाप्रमाणे १६ जून ते १५ आॅगस्ट या दरम्यान मासेमारी करण्यास बंदी असून सुध्दा या जलाशयात मोठ्या प्रमाणात अवैध मासेमारी होत आहे. या जलाशयातील मासेमारी करण्याचे कंत्राट मुंबई येथील योगेश सेठ या कंत्राटदाराला कंत्राट देण्यात आले. परंतु सदर कंत्राटदार जलाशयात अवैध मासेमारी करीत आहेत. कंत्राटदाराने नियमांना धाब्यावर ठेऊन आपला व्यवसाय जोमाने सुरू ठेवला आहे. १६ जून ते १५ आॅगस्ट हा काळ मास्यांसाठी अंडी घालण्याचा (बिजोत्पादनाचा) वेळ आहे. परंतु या काळात मासेमारी करणे हे मोठ्या प्रमाणात नुकसानदायक आहे. संबंधित विभागाने कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)
सिरपूरबांध जलाशयात अवैध मासेमारी
By admin | Published: June 28, 2016 1:34 AM