गोंदिया जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशाचे पालन न करता आरोपी कमलेश केशोराव पडोळे (५०) रा. गोवर्धन चौक, छोटा गोंदिया याने आपल्या घरी विक्रीकरिता देशी दारू सेव्हन स्टार पंचचे ३० नग, किंमत ७८०, मॅक्डॉवल्स नंबर १ इंग्लिश दारूचे ९० एमएलने भरलेले ३ नग किंमत २४० रुपये, आरएस रॉयल स्टॅग व्हिस्की इंग्लिश दारूचे १८ एमएलने भरलेले २ नग प्रत्येकी किंमत ३४० रुपये, स्टरलिंग रिझर्व बी ७ इंग्लिश दारूचे १८० एमएलने भरलेले २ नग प्रत्येकी किंमत ३६० रुपये, ऑफिसर्स चॉइस ब्ल्यूचे २ नग प्रत्येकी ३६० रुपये असा एकूण किंमत २०८० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक प्राजक्ता पवार यांनी केली आहे. गोंदिया शहर पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (इ),७७ (अ), भादंवि कलम १८८,२६९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोलीस नायक प्रकाश गायधने करीत आहेत.
छोटा गोंदियात अवैध दारूची विक्री, एकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 4:31 AM