लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयांतर्गत येणाºया सायगाव येथे वन विभागाने शुक्रवारी (दि.१८) दुपारी घातलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणात सागवान लाकडाचे चिरान (पाट्या) जप्त करुन आरोपी रेवनाथ धर्मा गायकवाड यास वनविभागाने ताब्यात घेतले.सायगाव येथे अवैधपणे सागवान चिरान असल्याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी सी.जी.रहांगडाले, श्वान मोबाईल वनपरिक्षेत्राधिकारी मेश्राम, नवेगावबांधचे प्रभारी वनपाल शेळवे, पठाण, बिसेन, मुंडे, काळसर्पे, मोहरुले, वनरक्षक राजगीरे, सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात धाड मारण्यात आली.यात सुमारे दोन लाख रुपये किंमतीचे सागवान चिरान जप्त करुन नवेगावबांध आगारात जमा करण्यात आले. आरोपी रेवनाथ धर्मा गायकवाड यास वनविभागाने ताब्यात घेतले आहे. वन गुन्हा कलम ४१, ४२ (१) अंतर्गत कार्यवाही करुन वनपरिक्षेत्राधिकारी रहांगडाले पुढील तपास करीत आहेत.
अवैध सागवान चिरान जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 9:46 PM
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयांतर्गत येणाºया सायगाव येथे वन विभागाने शुक्रवारी (दि.१८) दुपारी घातलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणात सागवान लाकडाचे चिरान (पाट्या).......
ठळक मुद्देवनविभागाची धाड : २ लाखांच्या मालासह आरोपी ताब्यात