शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

संविधानाची होळी करणाऱ्यांना त्वरीत अटक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:29 AM

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : भारतीयांचा मान, सन्मान,गौरव व विविध जाती धर्माच्या लोकांना, राज्यकर्त्यांना योग्य न्याय व हक्क प्रदान करणाऱ्या मनुवादी मानसिकतेच्या काही कार्यकर्त्यानी ९ आॅगस्टला जंतर मंतर दिल्ली येथे पोलीस यंत्रणेसमोर भारतीय संविधानाची जाहीर होळी केली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यामुळे त्यांच्यावर त्वरीत कारवाई करुन अटक करण्यात ...

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसची मागणी : तहसीलदारांना निवेदन, ठिकठिकाणी निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : भारतीयांचा मान, सन्मान,गौरव व विविध जाती धर्माच्या लोकांना, राज्यकर्त्यांना योग्य न्याय व हक्क प्रदान करणाऱ्या मनुवादी मानसिकतेच्या काही कार्यकर्त्यानी ९ आॅगस्टला जंतर मंतर दिल्ली येथे पोलीस यंत्रणेसमोर भारतीय संविधानाची जाहीर होळी केली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यामुळे त्यांच्यावर त्वरीत कारवाई करुन अटक करण्यात यावी. अशी मागणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली.या वेळी दिलेल्या निवेदनातून भारताचे स्वातंत्र्य, संविधान, राष्ट्रध्वजासाठी हजारो भारतीय व शूर सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. मात्र काही विकृत मानसिकेतेच्या कार्यकर्त्यांनी संविधानाची होळी करुन देशद्रोही कृत्य केले. अशा देशद्रोहींना त्वरीत अटक करण्यात यावी. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या वेळी दिला. शिष्टमंडळात माजी आ.दिलीप बंसोड, माजी म्हाडा सभापती नरेशकुमार माहेश्वरी, माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, तालुकाध्यक्ष कमलबापू बहेकार, जि.प.सदस्य सुकराम फुंडे, राजेश भक्तवर्ती रविंद्र मेश्राम, महिला अध्यक्ष कविता रहांगडाले, विद्यार्थी सेल अध्यक्ष प्रफुल ठाकरे, महामंत्री देवेंद्र मच्छिरके, मुक्तानंद पटले, सचिव संतोष श्रीखंडे, संजय रावत, रवी क्षिरसागर, निखिल पशिने, प्रमोद शिवणकर, सिताराम फुंडे, शिवचरण शिंगाडे, रमन डेकाटे, उमेश भोंडेकर, राहुल रामटेके, तुंडीलाल कटरे, मयूर मेश्राम, अनिल चोखांद्रे, केशव भिमटे, मनोज डोंगरे, शिला हजारे, टिकाराम मेंढे, अजय बिसेन, संतोष रहांगडाले, प्रकाश राऊत, किशोर रहांगडाले, गेंदलाल यावलकर यांचा समावेश होता.संविधान जाळणाºयांवर त्वरित कारवाई कराआमगाव : दिल्ली येथील जंतर मंतर येथे ९ आॅगस्टला दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर काही समाज विरोधी कार्यकर्त्यांनी भारतीय संविधानाच्या प्रती जाळल्या. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणा दिल्या. या संपूर्ण प्रकराचा येथील समाजबांधवानी निषेध नोंदविला. संविधानाचा अपमान करणाºया कारवाई करण्याची मागणी पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली.देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो विरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. असे असताना काही विकृत मानसिकतेच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक ठिकाणी भारतीय संविधानाची होळी करण्याचे देशद्रोही कृत्य केले. भारतीय संविधानाला जाळणाºया व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणा देणाऱ्या विकृत मानसिकतेच्या समाजकंटकाविरोधात प्रिव्हेशन आॅफ इन्सल्ट आॅफ नॅशनल आॅनर अ‍ॅक्ट १९७१ अ‍ॅन्ड १०२४ ए आयपीसी नुसार कार्यवाही करण्याची मागणी केली. शिष्टमंडळात भारतीय बौद्ध महासभेचे भरत वाघमारे, बामसेफ कर्मचारी संघटनेचे मिलिंद पंचभाई, समता सैनिक दलाचे आनंद बन्सोड, हलबा हलबी आदिवासी संघटनेचे वाय. सी. भोयर, भीम गर्जना संघटनेचे निखिल मेश्राम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे सचिव राजेंद्र सांगोळे, शिक्षक भारतीचे प्रकाश ब्राम्हणकर, ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष विनायक येडेवार, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे संदिप मेश्राम, यंग मुस्लिम विकास कमिटीचे मुस्ताकभाई व वाय.के. रामटेके उपस्थित होते.त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करादेवरी : ९ आॅगस्टला दिल्ली येथील जंतर मंतरवर काही असामाजिक तत्वांच्या लोकांनी संविधानाच्या विरोधात घोषणा देवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच संविधानाच्या प्रती जाळल्या. हे देश विरोधी कृत्य करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागणीचे निवेदन येथील मुलगंध कुटी बौद्ध विहार कमिटी व तालुक्यातील बौद्ध समाजबांधवांतर्फे देवरीचे ठाणेदार कमलेश बच्छाव यांना दिले.शिष्टमंडळात मुलगंध कुटी बौद्ध विहार कमिटीचे अध्यक्ष राजू देशपांडे, उपाध्यक्ष मधू शहारे, सचिव भाऊराव रंगारी, कोषाध्यक्ष राजू मडामे, पं.स.सदस्य महेंद्र मेश्राम, महिला व बाल कल्याण सभापती सीता रंगारी, नगरसेविका भूमिका बागडे, प्रतिमा देशपांडे, माधुरी मेश्राम, वसुधा देशपांडे, तारेश मेश्राम, रुपचंद जांभुळकर, गोपाल राऊत, प्रदीप रामटेके, मधुकर साखरे, सुरेंद्र कानेकर, प्रशांत उके, प्रशांत मेश्राम, महेश अंबादे, सुबोध देशपांडे, बन्सोड, खोब्रागडे यांचा समावेश होता.

टॅग्स :Morchaमोर्चा