लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना शासनाने जुनी पेंशन योजना लागू करावी, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्टÑ राज्य शिक्षक समितीतर्फे सोमवार (दि.२१) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.शिक्षक व कर्मचाºयांना शासनाने त्वरीत जूनी पेंशन योजना लागू करावी, खोटी आश्वासने देऊन शासनाने शिक्षकांची दिशाभूल बंद करावी, यासह अन्य मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला विविध संघटनेच्या सदस्यांनी पाठिंबा दिला. यावेळी सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी भेट देऊन समितीच्या पदाधिकाºयांसह चर्चा केली. आंदोलनात महाराष्टÑ प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा अध्यक्ष मनोज दीक्षित, विजय राठोड, किशोर डोंगरवार, विनोद बडोले, संदिप तिडके, पी. आर.पारधी, एन. बी. बिसेन, सुरेश कश्यप, बी. आर. दीप, पी. टी. रंगारी व इतर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांना निवेदन देण्यात आले.
शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 11:37 PM