लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महसूल विभागाचा सुधारीत आकृतीबंध दांगट समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचाऱ्यांची कपात न करता लागू करण्यात यावा यासह एकूण १५ मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने सोमवारपासून (दि.१५) - बेमुदत कामबंद आंदोलन छेडले आहे. याअंतर्गत येथील महसूल कर्मचारीही न आंदोलनात सहभागी झाले असून, . जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देऊन बसले आहेत.
महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध कोणत्याही संवर्गातील कर्मचाऱ्यांची कपात न करता लागू करण्यात यावा, अव्वल कारकुन- मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात तत्काळ पदोन्नती देऊन आदेश निर्गमित करण्यात यावे, महसूल विभागाचा आकृतीबंध तत्काळ मंजूर करून पुरवठा विभागातील पदभरतीमुळे रिक्त होणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांना महसूल विभागात सामावून घेण्यात यावे, वेतन देयके उणे प्राधिकारपत्रावर काढण्याबाबत तत्काळ शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा, महसूल सहायकाचा ग्रेडपे १९०० वरून २४०० करण्यात यावा, महसूल सहायक व तलाठ्यांना सेवांतर्गत एकसमान परीक्षा पद्धत लागू करण्यात यावी, महाराष्ट्र शासन वित्त विभागाची अधिसूचना दिनांक ३ फेब्रुवारी २०२३ नुसार तत्काळ अव्वल कारकुनांची वेतन निश्चिती करण्यात यावी, महसूल सहायकाची सेवा ज्येष्ठता यादी केवळ महाराष्ट्र महसूल अर्हता परीक्षा नियम १९९९ मधील तरतुदीनुसार तयार करण्यात यावी, महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची सेवापुस्तिका लेखाधिकारी वेतन पडताळणी पथकाऐवजी समकक्ष असलेल्या महसूल विभागातील नियुक्त लेखाधिकाऱ्यांच्या वेतन पडताळणी अधिकाऱ्यामार्फत करण्यात यावी, अव्वल कारकून या संवर्गाचे पदनाम बदलून सहायक महसूल अधिकारी असे करण्यात यावे, नायब तहसीलदार संवर्गाचा ग्रेड वेतन ४८०० करण्यात यावा, अव्वल कारकुनांना मंडळ अधिकारी पदावर अदला-बदली धोरणानुसार पदस्थापना देण्यात यावी, नायब तहसीलदार पदासाठी अव्वल कारकून-मंडळ अधिकाऱ्यांकरिता पदोन्नती विभागीय परीक्षा सरळसेवा याबाबतचे प्रमाणे ७०:१०:२० असे करण्यात यावे, चतुर्थश्रेणी-शिपाई कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना तलाठी संवर्गात २५% पदोन्नती देण्यात यावी तसेच कोतवाल पदांना चतुर्थश्रेणी 'ड' दर्जा देण्यात यावा व कोतवाल पदोन्नती कोटा वाढविण्यात यावा, या मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन छेडले आहे.
तालुकास्तरावर कर्मचारीही आंदोलनातमहसूल कर्मचाऱ्यांनी छेडलेल्या आंदोलनांतर्गत येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कर्मचारी मंडप टाकून शांततेत आंदोलन करीत आहेत. तर, तालुकास्तरावरील कर्मचारी सुद्धा या आंदोलनात सहभागी असून, ते तहसील कार्यालयाच्या आवारात आंदोलन करीत आहेत. महसूल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे मात्र नागरिकांची कामे अडकून पडली आहेत.
असे होते आंदोलनाचे स्वरूपया आंदोलनाबाबत महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने ९ जुलै रोजी तहसी- लदार व अपर तहसीलदारांना निवेदन देऊन कळविण्यात आले होते. त्याची प्रत जिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने आंदोलन छेडण्यात आले असून, १० जुलै रोजी काळ्या फिती लावून महसूल कर्मचाऱ्यांनी काम केले. ११ जुलै रोजी दुपारी जेवणाच्या सुटीत कार्यालयाच्या दारावर निदर्शने केली. १२ जुलै रोजी लेखणी बंद आंदोलन करून १५ जुलैपासून मात्र बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्यात आले आहे.