शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

डिजिटल दुनियेतही टपालचे महत्त्व कायमच

By admin | Published: October 10, 2016 12:19 AM

संदेश वहनाची अनेक साधने उपलब्ध झाली असली तरी टपालचे महत्त्व आजही टिकून आहेत. पोस्टकार्ड व

राज्याचे टपाल विभाग फायद्यातच : टेलीग्राम व अंडर पोस्टिंग सेवा बंद नरेश रहिले ल्ल गोंदिया संदेश वहनाची अनेक साधने उपलब्ध झाली असली तरी टपालचे महत्त्व आजही टिकून आहेत. पोस्टकार्ड व आंतरदेशीकार्ड वगळता सर्व टपाल सुरुच आहेत. टपाल वाहतुकीचे काम मात्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. इंटरनेट व मोबाईलचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला असला तरी टपालाचे महत्व कायमच आहे. पूर्वीच्या काळी भावनात्मक दृष्ट्या एकमेकांना जवळ आणण्याचे काम पोस्टाचे पत्र किंवा आंतरदेशी कार्ड करायचे. पोस्टमन कधी येईल याची प्रतीक्षा नागरिकांना असायची. नातेवाईकांनी पाठविलेले पत्र डाक कार्यालयात आले का याची शहनिशाही अनेकदा करायचे किंवा त्या पत्राच्या प्रतीक्षेत लोक असायचे. परंतु आता संदेश वहनाची कामे मोबाईलचे एसएमएस, फोन, व्हॉट्सअ‍ॅप, ई-मेल, फेसबुक, टिष्ट्वटर या माध्यमातून केले जातात. डाक विभागाचे संदेश वहन म्हणजे पोस्टकार्ड व अंतरदेशीकार्ड आता संदेशासाठी विक्रीला जात नाही. मात्र टपालचे महत्व कमी झाले असे मुळीच नाही. पूर्वीच्या तुलनेत लोक शिक्षीत झाले आहेत. आजच्या काळात ९० टक्के लोक सुशिक्षीत असल्यामुळे आपला व्यवहार करताना पोस्टाचा आधार घेतात असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सर्व बँकांचे एटीएम, महत्वाची कागदपत्रे, चेकबुक किंवा कोणतेही कागदपत्र पोस्टाच्याच माध्यमातून पाठविण्यात येतात. संदेश वहनाची इतकी साधने उपलब्ध नव्हती त्यावेळी दिवसाला १०० पोस्ट पत्रके पाठविली जात असली तर आता ५०० पोस्ट पत्र आता एकाच दिवशी पाठविले जात आहेत. यात एका दिवसात ४०० पत्राने वाढ झाली आहे. आता एलआयसीचे सर्व कागदपत्र पोस्टाच्याच माध्यामातून जात आहेत. सन २०१० मध्ये सरकारने केलेल्या मुल्यमापनात महाराष्ट्राची डाकसेवा १०७ कोटींच्या फायद्यात होती. आधुनिकीकरणाबरोबरच आताही महाराष्ट्र पुढे आहे. डाकविभागाचे काम वाढले आहे. परंतु सन १९८२ पासून भरती झाली नसल्याने मनुष्यबळाचा अभाव डाक विभागाला जाणवत आहे. शहराचा व्याप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु पोस्टमन वाढविण्यात येत नाही. डाक विभागाने वेळेनुसार वर्षभरापूर्वी टेलीग्राम व दोन वर्षापूर्वी अंडर पोस्टींग सेवा बंद केली आहे. असे असतानाही डिजिटल दुनियेत टपालाचे महत्त्व आजही कायम आहे. दिल्या जातात या नवीन सेवा ४डाक विभागामार्फत अटल पेंशन, न्यू पेंशन स्कीम, गंगाजल, कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा प्रसाद, एक्स्प्रेस पोस्टल पोस्ट, फॉरेन मेल, स्पीडपोस्ट, पीएलआय, आरपीएलआयची सेवा देण्यात येत आहे. नागरिकांना विश्वसनीय वाटणाऱ्या डाक विभागाची सेवा आजही जोमाने दिली जात आहे. आधुनिकीकरणातही पोस्टाचे किंचीतही महत्व कमी झाले नाही. -एच.आर. लांजेवार प्रभारी डाकपाल, गोंदिया मुख्य शाखा