लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : संदेश वहनाची अनेक साधने उपलब्ध झाली असली तरी टपालचे महत्त्व आजही टिकून आहेत. पोस्टकार्ड व आंतरदेशीकार्ड वगळता सर्व टपाल सुरुच आहेत. टपाल वाहतुकीचे काम मात्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. इंटरनेट व मोबाईलचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला असला तरी टपालाचे महत्त्व कायमच आहे.पूर्वीच्या काळी भावनात्मक दृष्ट्या एकमेकांना जवळ आणण्याचे काम पोस्टाचे पत्र किंवा आंतरदेशीकार्ड करायचे. पोस्टमन कधी येईल याची प्रतीक्षा नागरिकांना असायची. नातेवाईकांनी पाठविलेले पत्र डाक कार्यालयात आले का याची शहानिशाही अनेकदा करायचे किंवा त्या पत्राच्या प्रतीक्षेत लोक असायचे. परंतु आता संदेश वहनाची कामे मोबाईलचे एसएमएस, फोन, व्हॉट्सअॅप, ई-मेल, फेसबुक, टिष्ट्वटर या माध्यमातून केले जातात. डाक विभागाचे संदेश वहन म्हणजे पोस्टकार्ड व अंतरदेशीकार्ड आता संदेशासाठी विक्रीला जात नाही. मात्र टपालचे महत्त्व कमी झाले असे मुळीच नाही.पूर्वीच्या तुलनेत लोक शिक्षित झाले आहेत. आजच्या काळात ९० टक्के लोक सुशिक्षित असल्यामुळे आपला व्यवहार करताना पोस्टाचा आधार घेतात असे अधिकाºयांचे म्हणणे आहे. सर्व बँकांचे एटीएम, महत्त्वाची कागदपत्रे, चेकबुक किंवा कोणतेही कागदपत्रे पोस्टाच्याच माध्यमातून पाठविण्यात येतात. संदेश वहनाची इतकी साधने उपलब्ध नव्हती, त्यावेळी दिवसाला १०० पोस्ट पत्रके पाठविली जात असली तर आता ५०० पोस्ट पत्र आता एकाच दिवशी पाठविले जात आहेत. यात एका दिवसात ४०० पत्राने वाढ झाली आहे. आता एलआयसीचे सर्व कागदपत्र पोस्टाच्याच माध्यामातून जात आहेत.सन २०१० मध्ये सरकारने केलेल्या मुल्यमापनात महाराष्टÑाची डाकसेवा १०७ कोटींच्या फायद्यात होती. आधुनिकीकरणाबरोबरच आताही महाराष्टÑ पुढे आहे. डाकविभागाचे काम वाढले आहे. परंतु सन १९८२ पासून भरती झाली नसल्याने मनुष्यबळाचा अभाव डाक विभागाला जाणवत आहे. शहराचा व्याप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु पोस्टमन वाढविण्यात येत नाही.डाक विभागाने वेळेनुसार वर्षभरापूर्वी टेलीग्राम व दोन वर्षापूर्वी अंडर पोस्टींग सेवा बंद केली आहे. असे असतानाही डिजिटल दुनियेत टपालचे महत्व आजही कायम आहे.
डिजिटल दुनियेतही टपालाचे महत्त्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 9:46 PM
संदेश वहनाची अनेक साधने उपलब्ध झाली असली तरी टपालचे महत्त्व आजही टिकून आहेत.
ठळक मुद्देटपाल विभाग फायद्यातच : टेलिग्राम व अंडरपोस्टिंग सेवा बंद