लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लोकमतचे संस्थापक तथा स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त रविवार (दि.२) शहराच्या सुभाष बागेत रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.लोकमत वृत्तपत्रसमूह, लाईफ लाईन ब्लड बँक कॉम्पोनेंट आणि अप्रायसेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमाची सुरूवात स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने करण्यात आली.उद्घाटन गणेशन कॉन्व्हेंटचे संचालक एन.ए.एस. स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी संजय शेंडे होते. अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्त्या प्रा. सविता बेदरकर, मुख्याध्यापक वरूण खंगार, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख मिलिंद वाढई, लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी मुकेश शर्मा उपस्थित होते.आपल्या मार्गदर्शनात एन.ए.एस. स्वामी, प्रा. सविता बेदरकर व संजय शेंडे यांनी, रक्तदान हे महादान असून त्यामुळे दुसऱ्यांचे जीवन वाचविण्याचे सौभाग्य आपल्याला मिळविता येते. प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात रक्तदानाची भूमिका साकारून त्याबाबत जनजागृती करावी, असे आवाहन केले. तर लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख मिलिंद वाढई यांनी तरूणांना रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे वित्त व लेखा अधिकारी लखीचंद बावीस्कर यांनी प्रथम रक्तदान करून शिबिराला सुरूवात केली. लाईफ लाईन ब्लड बँकेचे संचालक डॉ. हरीश वारभे, डॉ. अपर्णा सागरे, डॉ. आर.जे. नागपुरे, तंत्रज्ञ प्रीती ठाकूर, सीमा पांडे, स्रेहल गुडधे, कामिनी राहोडी, हरीश ठाकूर, मनोज वानखेडे यांनी रक्त संकलन केले. प्रास्ताविक, संचालन व आभार लोकमत इव्हेंट्स जिल्हा संयोजक श्रीकांत पिल्लेवार यांनी केले. यावेळी सी.जे. पटले, विजय पटले, लखीचंद बावीस्कर, अंकुश गजभिये, संजय शेंडे, विजय शिररकर, विजयसिंग शेंगर, स्वप्नील गजभिये, राधेश्याम मटाले, वरूण खंगार, विजयकुमार ठवरे, शालू कृपाले, निखिल मेश्राम, बापट व इतरांनी रक्तदान केले.
बाबूजींच्या जयंतीला उत्स्फूर्त रक्तदान
By admin | Published: July 03, 2017 1:26 AM