शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
4
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
5
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
6
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
7
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
8
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
9
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
10
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
11
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
12
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
13
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
14
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
15
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
16
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
17
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
18
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
19
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

पवित्र पोर्टलच्या ‘अपवित्र’ हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 9:32 PM

राज्यातील लाखो बेरोजगार डीएड-बीएड पात्रताधारकांसाठी आशेचे किरण बनलेले शिक्षक भरतीचे पवित्र पोर्टल अलीकडे पोर्टलवरील अपवित्र हालचालींनी डोकेदुखी ठरत आहे. यामुळे अर्हताधारकांच्या नोकरीच्या आशा धुसर झाल्या असून निरुत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देनोकरीची आशा धुसर : पात्रताधारकात निरुत्साह

लोकमत न्यूज नेटवर्कवडेगाव : राज्यातील लाखो बेरोजगार डीएड-बीएड पात्रताधारकांसाठी आशेचे किरण बनलेले शिक्षक भरतीचे पवित्र पोर्टल अलीकडे पोर्टलवरील अपवित्र हालचालींनी डोकेदुखी ठरत आहे. यामुळे अर्हताधारकांच्या नोकरीच्या आशा धुसर झाल्या असून निरुत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.राज्यात शासनातर्फे २००८ या वर्षात शिक्षक भरती झाल्यानंतर मागील ११ वर्षांपासून शिक्षक भरतीसाठी शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ लागू झाला. त्यामुळे राज्यात अतिरीक्त शिक्षकांची समस्या भेडसावत आहे. शिक्षक संच मान्यतेचे अनेक प्रकरण प्रलंबित असताना राज्य शासनाने डीएड-बीएड बेरोजगारांना शिक्षक भरतीचा लॉलीपॉप दाखविणे सुरु केले आहे. शिक्षक पात्रता परीक्षेच्या नावाखाली पात्रताधारकांकडून दरवर्षी बक्कळ रक्कम गोळा केल्यानंतर शिक्षक बुद्धीमत्ता व अभियोग्यता चाचणी नावाचा नवीन पिल्लू काढण्यात आला. परंतु यावेळी पात्रताधारकांकडून तीव्र असंतोष व्यक्त केला गेला. हा असंतोष शमविण्यासाठी शासनातर्फे शिक्षक भरती करणार असल्याचा गाजावाजा करण्यात आला. त्यासाठी ३० मे २०१७ रोजी पवित्र पोर्टल (पोर्टल फॉर व्हिजीबल टू आॅल रिचर्स रिक्रूटमेंट) चे नामकरण करण्यात आले. त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषद, नगरपरिषद, महानगरपालिका, खासगी संस्थाकडून ई-निविदांच्या धर्तीवर उपलब्ध जागांची मागणी करण्यात आली. १२ मार्च २०१८ रोजी शासनाने शासन निर्णय जारी करुन पवित्र पोर्टलला शिक्षक भरतीसाठी रितसर मान्यता दिली. मात्र आज पवित्र पोर्टलला वर्ष लोटूनही पदभरतीच्या कुठल्याही पवित्र हालचाली सुरु झालेल्या नाहीत. याऊलट पवित्र पोर्टल आल्यापासून पात्रताधारकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पोर्टलवर उमेदवार अर्ज नोंदणी करण्याचा अपवित्र हालचालींनी डोकेदुखी वाढली आहे. पवित्र पोर्टलवर उमेदवार नोंदणी करणे, अर्ज भरणे, प्रत स्वप्रमाणित करणे, ड्राफ्ट कॉपी, वेरीफाईड कॉपी अशा अनेक अपवित्र हालचालींनी उमेदवारांच्या नाकी नऊ आले आहे. पवित्र पोर्टलच्या अपवित्र हालचाली एवढ्यातच थांबलेल्या नाहीत. एप्रिलमध्ये उमेदवारांना उपलब्ध जागा दाखवून पसंतीक्रम भरण्याची सूचना असताना अद्याप हालचाली शून्य आहेत. उलट पवित्र पोर्टल विरोधात अनेक याचिका न्यायालयात प्रलबिंत आहेत. तर न्यायालयाला उन्हाळी सुटी असल्यामुळे जूनपर्यंत न्यायालयाचे दार बंद आहेत. शिवाय पवित्र पोर्टलवरील भरतीच्या अनुषंगाने खासगी संस्थाचालक, इंग्रजी डीएड धारकांना २० टक्के राखीव जागा, संस्थांना उमेदवार निवडीचे अधिकार अशा अनेक अपवित्र याचिकांवर योग्य निर्णय लागेलच की नाही याबाबद शंका उपस्थित केली जात आहे.शिक्षक संघटनाचा विरोध कायमराज्यातील शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न त्यांच्या नोकरीवर गदा आणत असताना शासनाद्वारे शिक्षक भरतीचा पोकळ आव आणला जात आहे. याचा राज्यातील शिक्षक संघटनांनी विरोध केला.शासनाद्वारे अनेक सबबी पुढे करुन सरकारी शाळा बंद केल्या जात आहेत. आंतरराष्ट्रीय शाळेच्या नावाखाली स्वतंत्र चूल थाटली जात आहे. अतिरीक्त शिक्षक वाऱ्यावर आहेत, शिक्षण विभागातील पदवीधर, केंद्रप्रमुख, विषय शिक्षकांची पदे कार्यरत शिक्षकांमधून न भरता सरळसेवेतून भरती जात आहेत. यामुळे शिक्षक संघटनांनी या भरतीला विरोध दर्शविला आहे. दरम्यान पवित्र पोर्टलच्या अपवित्र हालचाली थांबून पवित्र शिक्षक भरती सुरु होते की, शिक्षक भरतीचा फार्स होतो याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक