शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

काँग्रेसमध्ये दुसऱ्याला उमेदवारी मिळू नये यासाठी चढाओढ सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 3:56 PM

सर्वाधिक स्पर्धा अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात : पक्षश्रेष्ठींचा वाढला ताप

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर आता सर्वांच्या नजरा उमेदवारीकडे लागल्या आहेत. जिल्ह्यातील चारही मतदारसंघांपैकी सर्वाधिक स्पर्धा अर्जुनी मोरगाव मतदारसंघात आहे. येथे काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची संख्या १७ वर असून, स्पर्धेतील दुसऱ्या उमेदवाराला उमेदवारी मिळू नये यासाठी पक्षश्रेष्ठींकडे जोरदार फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे येथे उमेदवारीपेक्षा दुसऱ्याला उमेदवारी मिळू नये यासाठी सर्वाधिक चढाओढ पाहायला मिळत आहे.

महाविकास आघाडीत अर्जुनी मोरगाव मतदारसंघ कुणाच्या वाट्याला हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून या मतदारसंघावर दावा केला जात आहे. त्यातच मंगळवारी हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे गेल्याची यादी व्हायरल झाली. त्यामुळे काँग्रेस पक्षातील इच्छुक उमेदवारांचे चेहरे काहीसे पडले होते. या मतदारसंघात निवडणूक लढण्यास इच्छुक उमेदवारांची संख्या १७ वर आहे. 

या सर्वांनीच गेल्या सहा महिन्यांपासून या मतदारसंघात मोर्चेबांधणी करून आपली उमेदवारी पक्की असल्याचे सांगण्यास सुरुवात केली. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व वरिष्ठ नेत्यांनी कुणालाच नाराज करायचे नाही, असे ठरवून सर्वच इच्छुकांना तयारीला लागा, सव्र्व्हेत काय होते पाहू, असे सांगितले. त्यामुळे सर्वच इच्छुकांनी मतदारसंघात सक्रिय होत सभा, मेळावे आणि कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. तर काँग्रेसचे जिल्ह्यातील काही ज्येष्ठ नेते अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार आधीच ठरला आहे. तो मतदारसंघातील असेल की बाहेरचा हे आम्ही नंतर सांगू असे सांगितले. तर स्पर्धेत असलेल्या इच्छुक उमेदवारांनी एकदाचा मतदारसंघातील चालेल; पण, बाहेरचा उमेदवार लादू नका, अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोर मांडल्याची माहिती आहे. पण, काँग्रेसच्या नेत्यांनी कहीं पे निगाहे कहीं पे निशाना असे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे इच्छुकांचीसुद्धा थोडी धाकधूक वाढली आहे. 

१५ सदस्यीय मंडळ घेणार आढावा अर्जुनी मोरगाव मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे राहावा, अशी या पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. यासाठी शिष्टमंडळाने दोनदा पक्षाचे नेते खा. शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर आता या पक्षाचे १५ सदस्यीय मंडळ या मतदारसंघाला लवकरच भेट देऊन आढावा घेणार आहे. त्यानंतरच या मतदारसंघाचा निर्णय होणार असल्याची माहिती आहे.

महायुतीचे वेट अॅण्ड वॉच महायुतीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे राहणार असल्याची माहिती आहे. पण, तरीही भाजपने या मतदारसंघावरील दावा अद्यापही सोडलेला नाही. माजी मंत्र्यांनी त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून, मुंबई, दिल्लीच्या वाऱ्या सुरू ठेवल्या आहेत. पण, उघडपणे यावर कुणीच बोलत नसून सर्वच जण वेट अॅण्ड वॉच करीत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाcongressकाँग्रेसElectionनिवडणूक 2024gondiya-acगोंदिया