लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पांढराबोडी येथील जीईएस हायस्कूल आणि कला व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य बी. एच. जीवानी यांच्या मार्गदर्शनात शुक्रवारी (दि. १२) क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले.अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंदन गजभिये होते. उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य भोजराज चुलपार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरपंच इमला चुलपार, माजी सरपंच निर्मला सुलाखे, उपसरपंच धुरण सुलाखे, दिगंबर चुलपार, राजेंद्र गेडाम, धनलाल लिल्हारे, पारबता दमाहे, सिमा साखरे, कविता मेश्राम, विद्यालयाचे प्राचार्य बी. एच. जीवानी, ए.जी.टेंभरे, क्रीडा प्रशिक्षक पी.एच.चव्हाण, यु. सी. रहांगडाले, आर. एस. रहमतकर, प्रा. सारीका सुंकरवार, ए. एल. जॉन, के. ओ. कावळे, एस. एन. मोरघडे, एस. एच. पोरचट्टीवार उपस्थित होते.कार्यक्रमात उपस्थित पाहुण्यांनी क्रीडा महोत्सवाचे आयोजन तसेच शालेय जीवनात खेळांचे महत्व काय याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल. तसेच अभ्यासासह खेळांचे देखील महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. प्राचार्य जीवानी यांनी शैक्षणिक विकासासह शारिरीक विकास तसेच खेळांचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते खेळाच्या मैदानाचे पूजन करुन क्रीडा स्पर्धेला सुरूवात करण्यात आली. प्रास्ताविक क्रीडा प्रशिक्षक पी. एच. चव्हाण, संचालन डी. एस. साखरे तर आभार विनोदकुमार माने यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा. सुनिल लिचडे, प्रा.आर.जी.चॅटर्जी, एन.ए.बुराडे, माधुरी राणे, सुशील गुणेरिया, प्रणय परशुरामकर, प्रदीप राठौड, डी.जे.डोमळे, गेंदलाल दुधबरई, रवि लिल्हारे, व्ही.जी.वासनिक, आर. बी. दमाहे, केशव वाघमारे, टी.एम.दास, एम.सी.कोल्हाटकर, कपिल चिखलोंढे, रोशनी सुलाखे, अभय मानकर, दिया सुलाखे, स्वाती चौधरी, शालू मंडीया, सम्यक मेश्राम, साक्षी सुलाखे, राहुल राऊत, शारदा सुलाखे, अतुल चुलपार, अजय ढेकवार, करीश करपगये, आरती नागपुरे, किरण लिल्हारे, विक्की गराडे, प्रमोद सुलाखे, दीक्षा बिसेन यांनी सहकार्य केले.
क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 11:54 PM
पांढराबोडी येथील जीईएस हायस्कूल आणि कला व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य बी. एच. जीवानी यांच्या मार्गदर्शनात शुक्रवारी (दि. १२) क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले.
ठळक मुद्देपांढराबोडी येथील जीईएस हायस्कूल आणि कला व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य बी. एच. जीवानी यांच्या मार्गदर्शनात शुक्रवारी (दि. १२) क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले.