लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतकऱ्यांना शेतमालाचा योग्य दर मिळावा, देशभरातील विविध बाजार समितीतील शेतमालाच्या दराची माहिती शेतकऱ्यांना मिळावी. यासाठी केंद्र सरकारतर्फे राष्ट्रीय कृषी बाजार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमालाचा योग्य दर मिळण्यास मदत होणार आहे.राष्ट्रीय कृषी बाजार योजनेतंर्गत शेतमालास योग्य भाव, शेतमालाचे वर्गीकरण, योग्य हाताळणी, मालाचे वजन व विक्री केलेल्या शेतमालाचे पैसे त्वरीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत.शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतमाल विक्रीसाठी आणल्यानंतर त्याची नोंद संगणकावर घेवून ती राष्ट्रीय कृषी बाजारच्या वेब पोर्टलवर करण्यात येते. नोंदणीकृत अडते खरेदीदारांना अशा नोंदणीकृत शेतमालाला बोली लावण्याचा अधिकार आहे. या प्रक्रियेत एकापेक्षा अधिक व्यापारी आॅनलाईन बोली लावत असल्यामुळे शेतकऱ्यांना अधिक दर मिळण्यास मदत होते.बाजार समितीत नोंद झालेल्या शेतमालास राज्यस्तरावर बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकारशासनाच्या नवीन आदेशानुसार बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची विक्री करणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आधार कार्ड, बँक खात्याची झेरॉक्स, मोबाईल क्रमांक याची माहिती बाजार समितीकडे देणे आवश्यक आहे.
कृउबाचा राष्ट्रीय कृषी बाजार योजनेत समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:19 AM
शेतकऱ्यांना शेतमालाचा योग्य दर मिळावा, देशभरातील विविध बाजार समितीतील शेतमालाच्या दराची माहिती शेतकऱ्यांना मिळावी. यासाठी केंद्र सरकारतर्फे राष्ट्रीय कृषी बाजार योजना राबविण्यात येत आहे.
ठळक मुद्देशेतकऱ्यांना मदत : शेतमालाच्या दराची माहिती मिळणार