नेटवर्कअभावी नागरिक झाले त्रस्त
देवरी : विविध शासकीय व खासगी कार्यालयांतील कामे ऑनलाइन सुरू आहेत. त्यामुळे मोबाईलचा वापरही वाढला आहे. नेटवर्कअभावी नागरिक त्रस्त झाले आहेत.
राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची वर्दळ
गोंदिया : चौपदरीकरण झालेला राष्ट्रीय महामार्ग शहरातून गेला आहे. या मार्गावरून भरधाव वाहनांची वर्दळ सतत असते. रस्त्यावरील वाहनांमुळे त्रास सहन करावा लागत आहे.
शहरात कोरोनाच्या नियमांची पायमल्ली
गोंदिया : कोरोनाला हरविण्यासाठी राज्य शासनाकडून विविध प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जिल्हा पातळीवरही नियम असून मात्र नागरिक नियमांची पायमल्ली करीत आहेत.
प्रवासी निवारा उभारा
मुंडीकोटा : तिरोडा तालुक्यातील नवेझरी या गावी प्रवासी निवारागृह होते; पण ते जीर्ण होऊन जमीनदोस्त झाले आहे. या ठिकाणी प्रवासी निवारागृह असणे फार गरजेचे आहे. नवेझरी गावासाठी ही बाब फार खेदाची आहे.
कटंगटोला मार्गावर पडले खड्डेच खड्डे
खातिया : गोंदिया तालुक्यातील चिरामनटोला ते कटंगटोला हा मार्ग पूर्णपणे उखडला असून, त्यात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. नागरिकांना ये-जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.
घोगरा ते देव्हाळा मार्गावर खड्डेच खड्डे
मुंडीकोटा : तिरोडा तालुक्यातील घोगरा ते देव्हाळा हा मार्ग पूर्णपणे उखडला असून, यात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. नागरिकांना ये-जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे समस्या कायम आहे. या मार्गावरून दोन्ही बाजूंनी शेती आहे. रस्ता पूर्णपणे उखडलेला असल्याने शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठीसुद्धा तारेवरची कसरत करावी लागत आहे. देव्हाळा येथे पेपर मिल असल्यामुळे अनेक मजूर या कारखान्यात रात्री-बेरात्री या रस्त्याने कामावर जातात. शाळकरी विद्यार्थी तुमसर येथील कॉलेजमध्ये याच मार्गाने जातात. तुमसर आगाराची तुमसर ते तिरोडा व्हाया घोगरामार्गे ही बससेवा सुरू होती; पण ती रस्त्याअभावी बंद करण्यात आली. घोगरा ते देव्हाळा या गावावरून गोंदिया ते नागपूरकडे बस धावत असतात. रेती भरलेले वाहनही या मार्गाने नेहमीच ये-जा करतात.