तिरोडा : लोकमतने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वाढ होण्याच्या तसेच चांगल्या सवई लावण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविले आहे. त्यात संस्काराचे मोती स्पर्धेचे नियोजन व उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वाढ करण्याचा उपक्रम होय, असे मत जिल्हा परिषद सदस्य सुनिता मडावी यांनी केले.लोकमतच्या वतीने भिवरामजी विद्यालय वडेगाव येथील संस्काराचे मोती स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी अध्यक्षीय भाषणातून त्या बोलत होत्या.पुढे त्या म्हणाल्या, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना चांगल्या सवई लागतात. सकाळी कुपणसाठी का होईना ते पेपर चाळतात. प्रश्न समजून घेतात, पेपर वाचतात, चालू घडामोडींची माहिती अद्यावत ठेवतात. त्यामुळे त्यांना भविष्यात स्पर्धा परीक्षेला या ज्ञानाचा फायदा नक्कीच होणार आहे, असे त्या म्हणाल्या. बक्षीस वितरक पं.स. सदस्य निता रहांगडाले यांनी स्पर्धा परीक्षा, उपक्रम व विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा यावर सविस्तर मार्गदर्शन केले. प्राचार्य ए.डी. पटले यांनी अभ्यास, स्पर्धा परीक्षा व सामान्य ज्ञान याची सांगड कशी घालावी यावर मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाचे आयोजक डी.आर. गिरीपुंजे यांनी आपल्या प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा, सामान्य ज्ञान कसे मिळवावे व वर्तमान पत्र वाचनाचे फायदे सांगितले. याप्रसंगी प्राचार्य ए.डी. पटले, पर्यवेक्षक एम.टी. सोनेवाने, माजी जि.प. सदस्य विष्णुपंत बिंझाडे, डी.एस. बोदेले, जे.सी. लांज़ेवार, एम.एम. अंबादे, एस.पी. भगत, व्ही.एच. जनबंधू, डी.आर. गिरीपुंजे, विनोद धावडे प्रामुख्याने उपस्थित होते. या वेळी डी.एस. बोदेले, एम.टी. सोनेवाने, व्ही.बी. बिंझाडे यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन बी.यू. बिसेन व प्रास्ताविक डी.आर. गिरीपुंजे यांनी केले. आभार डी.एस. बोदेले यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)‘संस्काराचे मोती’ स्पर्धेचे बक्षीस वितरण कोसमतोंडी : लोकमत वृत्तपत्र समूहामार्फत राबविण्यात येत असलेल्या लोकमत संस्काराचे मोती या स्पर्धेचे बक्षीस वितरण स्थानिक फुलीचंदजी भगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोसमतोंडी येथे करण्यात आले. प्राचार्य बी.बी. येळे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. याप्रसंगी लोकमतचे वार्ताहर टी.आर. झोडे व विद्यालयाचे सर्व कर्मचारीवृंद उपस्थित होते.सर्व विद्यार्थ्यांसमोर ड्रॉ पद्धतीने विजेत्या विद्यार्थ्यांचे नाव घोषित करण्यात आले होते. यामध्ये प्रथम क्रमांक श्वेता संजया मेश्राम, द्वितीय हृषीकेश विनायक उरकुडे व तृतीय क्रमांक अजय सेवक कापगते यांना मिळाले. तर प्रोत्साहनपर बक्षीस दिव्या मरस्कोल्हे, सुचिता कापगते, अश्विनी कुंभरे, श्रेया वैद्य, सपना वलथरे, प्रगती टेंभरे, गौरी कापगते, शीतल देशमुख, रुचित सयाम व अनोमा वैद्य यांना देण्यात आले.
‘संस्काराचे मोती’ स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वाढ-मडावी
By admin | Published: December 08, 2015 2:16 AM