शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

चार महिन्यात देणार करवसुलीवर जोर

By admin | Published: November 22, 2015 2:04 AM

यावर्षी गोंदिया नगर परिषदेची करवसुली अतिशय संथगतीने सुरू असल्याचे वृत्त शनिवारी ‘लोकमत’ने प्रकाशित करताच मुख्याधिकारी ...

मुख्याधिकाऱ्यांनी घेतली बैठक : मागील रेकॉर्ड ब्रेक करण्याचे कर्मचाऱ्यांना आवाहन गोंदिया : यावर्षी गोंदिया नगर परिषदेची करवसुली अतिशय संथगतीने सुरू असल्याचे वृत्त शनिवारी ‘लोकमत’ने प्रकाशित करताच मुख्याधिकारी गुणवंत वाहूरवाघ यांनी करवसुली विभागाची बैठक तातडीने बोलाविली. यावेळी आर्थिक वर्षाच्या उरलेल्या चार महिन्यात मागील वर्षापेक्षा जास्त करवसुली करून मागील वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक करण्याचे आवाहन त्यांनी केले. यासाठी त्यांनी स्वत: मैदानात उतरण्याचीही तयारी सुद्धा दर्शविल्याची माहिती आहे. पालिकेला आजघडीला पाच कोटी ५१ लाख सात हजार ११६ रूपये थकीत चार कोटी १४ लाख ३४ हजार ८७६ रूपये चालू (सन २०१५-१६) अशाप्रकारे एकूण नऊ कोटी ६५ लाख ४१ हजार ९९२ रूपयांची कर वसुली करावयाची आहे. यात पालिकेने एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यांच्या काळात ७४ लाख चार हजार २१४ रूपये थकीत व ४० लाख १५ हजार ७८७ रूपये चालू अशी एकूम एक कोटी १४ लाख २० हजार एक रूपयांची वसुली केली आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी कर वसुली पथकासह खुद्द मुख्याधिकारी सुमंत मोरे यांना सुद्धा मैदानात उतरावे लागले होते. परिणामी मागील वर्षी पालिकेची ५१.७२ टक्के करवसुली झाली होती. त्यामुळे यंदा कर वसुलीसाठी पालिका प्रशासनाकडून काय पाऊल उचलले जाते यावर यंदाची कर वसुली अवलंबून आहे. याबाबत ‘लोकमत’ने शनिवारी (दि.२१) बातमीच्या माध्यमातून प्रकाश टाकला. तसेच मागील वर्षी कर वसुली विभाग प्रभारी चालवित असताना यंदा कर निरीक्षक आहेत. त्यासोबत मुख्याधिकाऱ्यांची मिळालेली साथ या सर्व बाबी निदर्शनास आणून दिल्या. या बातमीची दखल घेऊन मुख्याधिकारी वाहूरवाघ यांनी विविध विभागांसह कर वसुली विभागाची बैठक बोलाविली. या बैठकीत त्यांनी कर वसुली वाढवून मागील वर्षीचे रेकॉर्ड तोडण्यावर भर दिल्याची माहिती आहे. शिवाय ते स्वत: कर वसुलीसाठी मैदानात उतरणार असल्याचीही माहिती मिळाली. (शहर प्रतिनिधी)