गर्दीच्या ठिकाणांवर चोरट्यांची नजर: हँडल लॉक केलेली वाहनेही पळविली जातात गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात दुचाकी पळविण्याचे मोठे प्रमाण आहे. महिन्याकाठी सहा मोटारसायकल पळविण्यात येत असल्याची टक्केवारी मागच्या वर्षी होती. यंदा या आकडेवारीत वाढ झाली आहे. परंतु या मोटारसायकल चोरांना पकडण्यात जिल्हा पोलीस अपयशी ठरले आहेत. आरोपींनी गर्दीच्या ठिकाणी असलेल्या अस्ताव्यस्त वाहनांवर करडी नजर ठेवून त्या गाडी मालकाची नजर चुकवून मोटारसायकल पळविण्याचा उपक्रम सुरू केला आहे. परंतु ते मोटारसायकल चोरटे पोलिसांच्या हातात आले नाही. चोरलेल्या मोटारसायकलवरचा लगेच क्रमांक काढून ते वाहन राजरोसपणे शहरात किंवा जिल्ह्यात चालविल्या जातात. चोरलेल्या वाहनांवर बोगस क्रमांक लावून ते वाहन नेहमी वापरण्यात येत असते. गोंदिया शहरातून सर्वात जास्त वाहने चोरीला जातात. बेशिस्त पार्र्कींगचा फायदा घेत ते वाहन चोरण्यास चोरट्यांना सहज शक्य होते. गोंदियातील बेशिस्त पार्कीेंगमुळे वाहन चोरट्यांना वाहन पळविणे सहज शक्य होते. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी) गर्दीचे ठिकाण चोरट्यांचे ‘लक्ष्य’ मोटारसायकल चोरी करणारे आरोपी गर्दीचा फायदा घेत वाहन चोरी करतात. गोंदिया शहरातून चोरीला गेलेल्या मोटारसायकल सर्वात जास्त गर्दीच्या ठिकाणातून पळविण्यात आल्या आहेत. रेल्वेस्थानक, बँक परिसर, रूग्णालय, बसस्थानक व बाजार परिसरातून या मोटारसायकल पळविल्या आहेत. गर्दीचा फायदा घेत वाहनाला पळवून नेण्यात चोरटे यशस्वी होतात. वाहनचालकांनी हे करावे वाहन चालकांनी नेहमी आपल्या सोबत वाहनाचे कागदपत्र ठेवावे. परंतु ते कागदपत्र वाहनाच्या डिक्कीत न ठेवता स्वत:कडे ठेवावे. वाहनच्या डिक्कीत कागदपत्र ठेवले व ते वाहन चोरीला गेल्यास त्या वाहनाला विकणे आरोपीला सोपे जाते.त्यासाठी वाहनाच्या डिक्कीत कागदपत्र ठेवू नये. चोरीची वाहने जात असताना पोलिसांना ओळखता येत नाही त्यासाठी प्रत्येक वाहन चालकाने आरसी बुकची झेरॉक्स तरी आपल्याकडे ठेवल्यास वाहन चोरीवर आळा घालण्यासाठी मदत होईल. रात्रीच्या वेळी आपल्या घरी वाहन ठेवताना त्या वाहनांना लोखंडी साखळीने बांधून ठेवावे. ५ रूपयांसाठी ५० हजार जातात रेल्वेस्थानकाच्या बाहेर शेकडो गाड्या बेवारस पडलेल्या असतात. रेल्वेस्थानकावर मोटारसायकल ठेवण्यासाठी स्टँड आहे. मात्र ५ रूपये गाडीच्या सुरक्षेसाठी न देण्याची मानसिकता ठेवणाऱ्या व्यक्तींचे ५० हजार रूपयाचे वाहन चोरीला जाते.
अस्ताव्यस्त पार्र्कींगमुळे वाहन चोरीत वाढ
By admin | Published: August 15, 2016 12:35 AM