भुजबळ : पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे घेतलीगोंदिया : पोलीस दलाची कार्यकुशलता वाढविण्यावर आपला भर राहणार असून गुन्ह्यांच्या तपासामध्ये विशेष लक्ष केंद्रीत करणार असल्याची प्रतिक्रिया नवीन पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप भुजबळ यांनी व्यक्त केली.शशीकुमार मीना यांची बदली झाली. मात्र ते सुटीवर असल्यामुळे अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले यांच्याकडून डॉ.भुजबळ यांनी शुक्रवार दि.२० रोजी सूत्रे स्वीकारली. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती उत्तम ठेवण्यासोबतच वाहतूक नियंत्रण, पोलिसांचे व्यावसायीक कौशल्य वृध्दींगत करण्याकडे ते लक्ष देणार आहेत. पोलीस स्टेशनमध्ये व पोलीस विभागाशी संबंधित असलेल्या सर्व कार्यालयांमध्ये कामानिमित्त येणाऱ्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न राहील. जातीय सलोखा कायम ठेवून लोकांशी पोलिसांचे संबंध वृध्दींगत करु न ते अधिक सक्षम करण्यावर आपला भर राहणार असल्याचे डॉ.भुजबळ यांनी सांगितले.डॉ.दिलीप भुजबळ यांची १९९२ ला राज्य सेवेतून पोलीस उपअधीक्षक या पदावर निवड झाली. त्यांनी धुळे (शहर), पुसद व कामठी येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम केले आहे. सप्टेंबर २००३ मध्ये त्यांना भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) पदोन्नती मिळाली. मुंबई येथील परिमंडळ ७ मध्ये उपायुक्त, मुंबई येथील दंगल नियंत्रण पथक कक्षात उपायुक्त, पुणे येथील गुन्हे अन्वेशन विभागात पोलीस अधीक्षक, पुणे येथे राष्ट्रीय महामार्गमध्ये पोलीस अधीक्षक तसेच नागपूर येथे राष्ट्रीय महामार्गमध्ये पोलीस अधीक्षकपदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांनी सांभाळला आहे. गोंदिया येथे पोलीस अधीक्षक म्हणून येण्यापूर्वी डॉ.भुजबळ हे सन २०१४ पासून सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील तुर्ची येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्राचार्य म्हणून कार्यरत होते. डॉ.भुजबळ यांनी एलएलएम ही कायद्याची पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर मागील वर्षी पीएचडी सुध्दा केली आहे. पीएचडीच्या शोधप्रबंधाचा विषय ‘द इम्पॅक्ट आॅफ ज्युडिसीयल डिसीजन आॅन द पॉवर आॅफ पोलीस इन क्रि मीनल इन्व्हेस्टीगेशन’ असा होता. सन २०१५ मध्ये त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पीएचडीने सन्मानित करण्यात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
पोलिसांची कार्यकुशलता वाढविण्यावर भर
By admin | Published: May 23, 2016 1:39 AM