लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पूर्व विदर्भातील सर्वाधिक मामा (माजी मालगुजारी) तलावांचा जिल्हा म्हणून गोंदियाची ओळख आहे. मात्र या तलावांमधील गाळाचा ४० ते ५० वर्षांपासून उपसा न केल्याने त्यांची क्षमता कमी झाली होती. तर काही तलावांवर अतिक्रमण झाले होते. बºयाच उशीरा का होईना शासनातर्फे मामा तलावांच्या पुनरुज्जीवनाने सिंचन क्षमतेत वाढ झाली असून ४०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात यश आले आहे.जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील ४४८ मामा तलावांच्या पुनरु ज्जीवन कार्यक्र माला पहिल्या टप्प्यात २०१६-१७ या कालावधीत सुरूवात करण्यात आली. यापैकी ३९७ मामा तलावातील गाळाचा उपसा करण्याचे आदेश देण्यात आले. यापैकी १५५ तलावांच्या पुनरुज्जीवनाची कामे पूर्ण करण्यात आली. यातून ६ लाख ६९ हजार ५८७.६७ घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला.परिणामी तलावांच्या सिंचन क्षमतेत तेवढीेच वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील ४०० हेक्टर शेतीला सिंचनाची सोय होणार आहे. जिल्ह्यात १०० हेक्टर सिंचन क्षमतेचे १७७८ मामा तलाव असून याची सिंचन क्षमता ३५ हजार ४५८ हेक्टर आहे. त्यात १०० हेक्टरपेक्षा जास्त सिंचन क्षमतेचे ३८ मामा तलाव असून याची सिंचन क्षमता ६ हजार ५१० हेक्टर आहे. या तलावांच्या माध्यमातून २१ हजार ८२९ हेक्टरला सिंचन होते. तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेला गोंदिया हा मागास, दुर्गम, आदिवासी बहुल व नक्षलदृष्ट्या संवेदनशील जिल्हा म्हणूनही ओळखला जातो. जिल्ह्यात धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. या पिकाला पाण्याची अधिक आवश्यकता असते. मात्र याला अनेकदा अनियमित पावसाचा फटका बसतो. यावर्षी देखील अत्यल्प पावसाचा पिकांना फटका बसला. मामा तलावातून सिंचनाची व्यवस्था निर्माण करण्यासाठी शासनाने दूरदृष्टीकोनातून पूर्व विदर्भातील माजी मालगुजारी तलावांचे पुनरूज्जीवन करु न त्यांना संजीवनी देण्याचा विशेष कार्यक्र म हाती घेतला आहे. त्यामुळे या तलावांची सिंचन क्षमता वाढवून अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली आणण्यास मदत होणार आहे.रब्बी पिकांना होणार मदतमामा तलावांचा मत्स्यपालनासाठी उपयोग केला जात आहे. यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून शेतकºयांना मत्स्यपालन करणे शक्यत होत आहे.५० हेक्टरपेक्षा जास्त सिंचन क्षमतेच्या तलावातील पाण्याचा उपयोग या पुनरुज्जीवनाच्या विशेष कार्यक्रमामुळे शेतकºयांनी करायला सुरु वात देखील केली आहे. केवळ एका पाण्याच्या कमतरतेमुळे उत्पादनात येणारी घट उपलब्ध पाण्यामुळे भरु न निघण्यास मदत झाली आहे. काही शेतकºयांनी रबी हंगामात धान पिकाव्यतिरिक्त भाजीपाला, हरबरा, गहू ही पिके घेण्यास सुरु वात केली आहे.मामा तलावांना ३५० वर्षांचा इतिहासजिल्ह्याची ओळख राज्यात तलावांचा जिल्हा म्हणून आहे. ३५० वर्षापूर्वी सोळाव्या शतकात तत्कालीन गोंडराजा हिरशहा यांनी भविष्यातील पाण्याची आवश्यकता लक्षात घेता फर्मान काढले की, जो कोणी जंगले साफ करु न शेती करेल त्याला ती बहाल केली जाईल आणि जो कोणी तलाव बांधेल, त्याला त्या तलावाखालील जितकी जमीन असेल ती खुद शेतकरी म्हणून बक्षीस दिली जाईल. या संधीचा उपयोग करु न घेत जिल्ह्यातील त्यावेळेस कोहळी व पोवार समाजातील मालगुजारांनी लोकसहभागातून तत्कालीन शाश्वत सिंचन व्यवस्थापनाची एक परंपरागत पद्धत आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दूरदृष्टिकोनातून तलावांची निर्मिती केली. ब्रिटीश काळात हया तलावांची मालकी मालगुजारांकडे होती. सन १९५० मध्ये शासनाने हे तलाव मालगुजारांकडून ताब्यात घेतले. तेव्हापासून हे तलाव माजी मालगुजारी तलाव म्हणून ओळखले जातात.
मामा तलावांच्या पुनरूज्जीवनाने सिंचनात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:14 AM
पूर्व विदर्भातील सर्वाधिक मामा (माजी मालगुजारी) तलावांचा जिल्हा म्हणून गोंदियाची ओळख आहे. मात्र या तलावांमधील गाळाचा ४० ते ५० वर्षांपासून उपसा न केल्याने त्यांची क्षमता कमी झाली होती.
ठळक मुद्दे१५५ तलावांतून गाळाचा उपसा : ४०० हेक्टर सिंचन क्षेत्रात वाढ