मुख्य शासकीय ध्वजारोहण
देवरी येथील तहसील कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण उपजिल्हाधिकारी अनमोल सागर यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी शहरातील प्रतिष्ठीत नागरिक,लोकप्रतिनिधी सर्व अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
पोलीस स्टेशन
येथील पोलीस स्टेशनचे ध्वजारोहण अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांच्या हस्ते ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. याप्रसंगी पीएसआय नरेश उरकुडे, आनंदराव गाडगे, माने व बोपचे उपस्थित होते.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
देवरी येथील एकात्मीक आदीवासी विकास प्रकल्प येथील ध्वजारोहण प्रकल्प अधिकारी अनमोल सागर यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी सहायक प्रकल्प अधिकारी अरुण सूर्यवंशी, हरिश्चंद्र सयाम, स्टेनो शिवाजी तोडकर यांच्यासह कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
पंचायत समिती
येथील पंचायत समितीचे ध्वजारोहण गटविकास अधिकारी चंद्रमणी मोडक यांच्या हस्ते आणि पं.स.चे सर्व विभागातील अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थित पार पडले.