शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
4
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
5
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
6
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
7
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
8
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
9
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
10
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
11
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
12
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
13
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
14
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
16
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
17
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
18
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
19
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
20
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

स्वातंत्र्यदिनी जिल्हाभर ध्वजवंदन

By admin | Published: August 17, 2016 12:12 AM

जिल्ह्यात भारतीय स्वातंत्र्याचा ६९ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

गोंदिया : जिल्ह्यात भारतीय स्वातंत्र्याचा ६९ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा-महाविद्यालयांसोबत विविध सरकारी व खासगी संस्थांच्या कार्यालयांमध्ये स्वातंत्र्यदिनी तिरंगी ध्वज फडकविण्यात आला. बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, तिरोडा गोंदिया : तिरोडा येथील बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त ज्येष्ट नागरिक कांचन भिमटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी शाखा प्रमुख अभियंता सुनील बडगे, प्राचार्य विभा गजभिये, शिक्षिका सोनाली डोंगरे, गुणप्रिया मेश्राम, स्वाती बंसोड, नलिना बागडे, गजभिये, उके, पालक उल्हास टेंभेकर, अमर शहारे, वासनिक, अ‍ॅड. नरेश शेंडे, देवानंद शहारे उपस्थित होते. महापुरूषांच्या छायाचित्राला माल्यार्पण व दीप प्रज्ज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषण, गीत व नृत्य सादर केले. शिक्षिकांनी मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात बडगे यांनी, वैज्ञानिक दृष्टिकोण, धम्म संस्कार व आधुनिक शिक्षण यावर मार्गदर्शन केले. मान्यवरांनीसुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. मूलनिवासी गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. साकेत पब्लिक स्कूल गोंदिया : अवधुत शिक्षण संस्थेद्वारा संचालित साकेत पब्लिक स्कूलच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दिव्या भगत, वैशाली खोब्रागडे, सविता बेदरकर, अपर्ना कोलते, डॉ. सुवर्णा हुबेकर उपस्थित होते. यावेळी सांस्कृतीक सादर केले. यावेळी वर्ग ६ वी व ७ वीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीत व नृत्य सादर केले. जेष्ठांच्य सन्मानात नाटिका सादर केली. यावेळी राहूल बजाज, तृप्ती बिसेन व उन्नती कोलते यांना सम्मानित करण्यात आले. आभार चेतन बजाज यांनी मानले. ईदगाह मैदान, गोंदिया गोंदिया : ईदगाह मैदान बालाघाट रोड येथे मुस्लीम जमातच्या वतीने झेंडावंदन करण्यात आले. अध्यक्षस्थानी खालीद पठान होते. यावेळी आजाद उर्दू शाळेचे सर्व विद्यार्थी व शिक्षक-शिक्षीका उपस्थित होते. कार्यक्रमाला बोरकर, मेहताबभाई, रफीक खान यांनी आपले विचार मांडले. आभार रफीक खान यांनी मानले. यशस्वितेसाठी अहमद मनीयार, जावेद, समीर, अकरम, बबलू, हफीज, असलम,मुजीब बेग, सुभानभाई, शब्बीर खान, इशाक बेग, अमरदीप सोलंकी, इकबाल, कय्युमभाई, प्यारेभाई, खुर्शीदभाई यांनी सहकार्य केले. मालतीदेवी जायस्वाल वरिष्ठ प्राथ.शाळा गोंदिया : पंचायत समिती कॉलनीतील ग्रामीण शिक्षण संस्थाद्वारे संचालित मालतीदेवी जायस्वाल वरिष्ठ प्राथमिक शाळेत अ‍ॅड. योगेश अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. बन्सोड, पाहुणे म्हणून मोहसीन खान, रामविलास बिसेन, दुर्गा वर्मा, ओमप्रकाश कावळे, गोकूल तुरकर, जैतवार उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन व भाषण सादर केले. संचालन सुनील हत्तीमारे तर आभार निर्मला बिसेन यांनी मानले. यशस्वितेसाठी मुख्याध्यापक बाळकृष्ण पडले, सुरेशसिंह अटराहे, सुनील हत्तीमारे, सुनिता धपाडे, निर्मला बिसेन, डिलेश्वरी यांनी सहकार्य केले. त्रिवेणी वरिष्ठ प्राथ.शाळा गोंदिया : स्थानिक त्रिवेणी वरिष्ठ प्राथमिक शाळेत ध्वजारोहण संस्थाध्यक्ष येशूलाल बडोले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रफुल जरोदे होते. मुख्याध्यापिका कमल कासारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. संचालन हितेश पटले यांनी केले. यशस्वीतेसाठी बागडे, लिल्हारे, डॉ. तागडे, पटले, एस.सी. ठाकरे यांनी सहकार्य केले. संघमित्रा प्राथ.शाळा संजयनगर गोंदिया : संघमित्रा प्राथ.शाळा संजयनगर येथे पं.स. सदस्य दीपा चंद्रीकापुरे यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. यावेळी अनिल अंबुले, आशिष कटरे, रिता चौरे उपस्थित होते. यावेळी प्रभातफेरी काढण्यात आली. मुख्याध्यापक गजभिये यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. कार्यक्रमाला सतिसेवक, परतेती, एस.बी. भोयर, एम.टी. मेळे, एस.सी. वालदे यांनी सहकार्य केले. गोंदिया पब्लिक स्कूल गोंदिया : डीबीएम शिक्षण संस्थेद्वारे संचालित गोंदिया पब्लिक शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. गांधीजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन जी.जी. कुथे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अध्यक्ष अर्जुन बुद्धे, उपाध्यक्ष जी.जी.कुथे, डॉ. अमित बुद्धे, शुभांगी येरणे, रिता अग्रवाल, प्रफुल वस्तानी उपस्थित होते. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी संगीत शिक्षक गजभिये यांच्या मार्गदर्शनात देशभक्ती गीत सादर करण्यात आले. इंदिरा सपाटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संचालन शेखर बिंधानी यांनी केले. आभार आरती भावे यांनी मानले. यशस्वितेसाठी माणस मिश्रा, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. महर्षी विद्या मंदिर गोंदिया : महर्षी विद्या मंदिर येथे ममता अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी गीत व भाषण सादर केले. यावेळी इंग्रजाच्या गुलामगिरीतून आपन कसे मुक्त झालो यावर एक नाटक सादर करण्यात आली. कार्यक्रमाला तुमखेडावासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुलांना गोड पदार्थ वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. चंद्रभागा शांताबेन पूर्व माध्यमिक शाळा गोंदिया : चंद्रभागा शांताबेन पूर्व माध्य. शाळा चंद्रशेखर वार्ड येथे अध्यक्ष सुरजीतसिंग गांधी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात