लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : सालेकसा नगर पंचायतच्या नगराध्यक्षपदी भाजपचे बंडखोर उमेदवार विरेंद्र उईके निवडून आले. तर नगरसेवकपदी सर्वाधिक सहा अपक्ष उमेदवार निवडून आले. मतदारांनी कुठल्याच पक्षाला बहुमत दिले नाही. त्यामुळे या निकालाने सर्वांनाच आश्चर्य चकीत केले आहे.सालेकसा नगर पंचायतसाठी बुधवारी (दि.१३) रोजी मतदान घेण्यात आले. त्यानंतर गुरूवारी (दि.१४) रोजी सकाळी मतमोजणी करण्यात आली. यात नगराध्यक्षपदावर भाजपचे बंडखोर उमेदवार विरेंद्र उईके यांनी काँग्रेसच्या श्यामकला प्रधान यांचा २७ मतांनी पराभव करीत नगराध्यक्षपदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेतली.या निवडणुकीत भाजपचे पानीपत झाले असून या पक्षाचे उमेदवार तिसºया क्रमांकावर राहीले. तर नगराध्यक्षपद गमविताच नगरसेवकांच्या बहुमतापासून भाजप दूर असल्याचे चित्र आहे. एकूण १७ पैकी केवळ ५ नगरसेवक निवडून आणण्यात भाजपाला यश आले. काँग्रेसचे चार आणि शिवसेनेचे दोन नगरसेवक निवडून आले. अपक्ष म्हणून मैदानात उतरलेले भाजपचे सहा बंडखोर उमेदवार नगरसेवक झाले. या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही.त्यामुळे पुढे जाऊन अपक्ष नगरसेवक भाजपासोबत की तटस्थ राहणार हे मात्र आताच सांगता येत नाही. येथील नगर पंचायत निवडणुकीत पहिल्या नगराध्यक्षपदासाठी एकूण पाच उमेदवार रिंगणात होते.यात भाजपचे किशोर गावराने, काँग्रेसच्या श्यामकला प्रधान, राष्ट्रवादी काँग्रेसचे विनोद मडावी यांचा समावेश होता. भाजपने ऐनवेळी उमेदवारी नाकारल्यामुळे भाजपचे विरेंद्र उईके यांनी बंड पुकारत अपक्ष म्हणून अर्ज भरला. भाजपातील असंतुष्ट उमेदवारांचा गट तयार करुन १२ उमेदवारांना नगरसेवकपदासाठी उभे केले. दुसरीकडे काँग्रेसच्या सुनंदा उईके ह्या सुध्दा अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरल्या होत्या.यामुळे मतांची विभाजन होऊन नेमका विजय कोणत्या पक्षाच्या पारड्यात पडेल हे सांगता येणे कठीण होते. नगरसेवक पदासाठी एकूण १७ पैकी भाजपचे पाच नगरसेवक निवडून आले.प्रभाग १२, १३, १४, १५ आणि १६ येथे हलबीटोला गावात भाजपचे नगरसेवक निवडून आले. प्रभाग ५,६,९ आणि १७ मध्ये चार ठिकाणी काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले. तर प्रभाग ४ आणि ११ मध्ये दोन ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले. परंतु प्रभाग १,२,३,७,८ आणि १० मध्ये अपक्ष उमेदवारांनी सहा प्रभागावर दणदणीत विजय मिळवित सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना मिळालेली मतेनगरपंचायत निवडणुकीत एकूण २४३५ मतदारांनी मतदान केले होते. यापैकी विरेंद्र उईके (अपक्ष) यांना ७६१, श्यामकला प्रधान (काँग्रेस) ७३४, किशोर गावराने (भाजप) ७०६ मते पडली. तर विनोद मडावी (रॉका)१८१, सुनंदा उईके (अपक्ष) यांना ३४ मते मिळाली. तर नोटामध्ये १९ मते पडली. नगराध्यक्षापदाच्या तिरंगी सामन्यात अपक्ष उमेदवार विरेंद्र उईके यांनी काँग्रेस व भाजपच्या उमेदवाराचा पराभव करित २७ मतांनी विजयी मिळविला.प्रभाग निहाय विजयी उमेदवारप्रभाग क्रमांक १ बबिता कोडापे (अपक्ष), प्रभाग क्रमांक २ पारबताबाई पंधरे (अपक्ष), प्रभाग क्रमांक ३ जानकीबाई टेकाम (अपक्ष), प्रभाग क्रमांक ४ लक्ष्मीबाई गडपाल (शिवसेना), प्रभाग क्रमांक ५ शशिकला ढेकवार (काँग्रेस), प्रभाग क्रमांक ६ कृष्णा भैसारे (काँग्रेस), प्रभाग क्रमांक ७ सुनिता उईके (अपक्ष), प्रभाग क्रमांक ८ दमयंता कोटांगले(अपक्ष), प्रभाग क्रमांक ९ सपन प्रधान (काँग्रेस), प्रभाग क्रमांक १० उमेदवलाल जैतवार (अपक्ष), प्रभांग क्रमांक ११ वंदना क्षीरसागर (शिवसेना), प्रभाग क्रमांक १२ फुलवंता फरकुंडे (भाजप), प्रभाग क्रमांक १३ प्रल्हाद वाढई (भाजप), प्रभाग क्रमांक १४ रविता वलथरे (भाजप), प्रभाग क्रमांक १५ धनराज जंगेरे (भाजप), प्रभाग क्रमांक १६ मंगला चौधरी (भाजप), प्रभाग क्रमांक १७ मंगलाबाई करंडे (काँग्रेस) यांचा समावेश आहे.
सालेकसा नगर पंचायतवर अपक्षांचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 1:14 AM
सालेकसा नगर पंचायतच्या नगराध्यक्षपदी भाजपचे बंडखोर उमेदवार विरेंद्र उईके निवडून आले. तर नगरसेवकपदी सर्वाधिक सहा अपक्ष उमेदवार निवडून आले. मतदारांनी कुठल्याच पक्षाला बहुमत दिले नाही.
ठळक मुद्देनगराध्यक्षपदी विरेंद्र उईके यांची वर्णी : भाजपचे पाच तर काँग्रेसचे चार नगरसेवक विजयी