कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : स्वातंत्र्यदिनीही नगर परिषदेच्या कॉन्व्हेंटमधील विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वातंत्र्य दिनापर्यंत कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले जाणार असल्याचे नगर परिषदेच्या शिक्षण विभागाचे आश्वासन फोल ठरले आहे. यामुळे स्वातंत्र्य दिनीही कॉन्व्हेंट मधील विद्यार्थी गणवेशाविनाच राहणार आहेत.नगर परिषदेच्या शिक्षण विभागात सुधारणा व्हावी व शाळांचा दर्जा वाढावा यासाठी यंदा नवनवे प्रयोग करण्यात आले. शिक्षण समिती सभापतींनी यातच कॉन्व्हेंट सुरू करण्याचा प्रयोग हाती घेत १० कॉन्व्हेंट सुरू केलेत. या प्रयोगाला प्रतिसाद मिळावा यासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्य, गणवेश व अन्य सुविधा पुरविण्याचे आश्वासन देण्यात आले. यासाठी शहरात ठिकठिकाणी होर्डींग्स लावून प्रसिद्धी करण्यात आली. नगर परिषदेच्या प्रयोगाला शहरवासीयांनी चांगला प्रतिसादही दिला.यामुळेच १० कॉन्व्हेंटमध्ये सुमारे २५० विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला. कॉन्व्हेंट सुरू होऊन महिनाभºयाच्यावर काळ लोटूनही दिलेल्या आश्वासनांची शिक्षण विभागाकडून पुर्तता करण्यात आली नाही. यामुळे पालकांत चांगलाच रोष व्याप्त आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी पुस्तकांचे वाटप झाल्याची माहिती आहे. तर विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनापूर्वी एक जोड गणवेश दिला जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून बोलले जात होते. यामुळे स्वातंत्र्य दिनी विद्यार्थी गणवेशात दिसणार असे वाटत होते. मात्र त्यावरही पाणी फेरले असून स्वातंत्र्य दिनी विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.आश्वासनांची खैरात वाटून नगर परिषदेने विद्यार्थ्यांचे प्रवेश मिळवून घेतले. मात्र आश्वासनांची पूर्तता करण्यात आता नगर परिषद फेल ठरत असल्याने पालकांत चांगलाच रोष व्याप्त आहे. व्यवस्था नसताना शिक्षण विभागाने स्वातंत्र्य दिना पर्यंतचे खोटे आश्वासन दिले. मात्र दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होणार नसल्याने स्वातंत्र्य दिनीही कॉन्व्हेंटचे विद्यार्थी गणवेशाविनाच राहणार आहेत हे विशेष.साहेबांची सही झाली नाहीशिक्षण विभागात गणवेश मिळणार नसल्याचे कारण विचारले असता गणवेशच्या नोटशीटवर साहेबांची सही झाली नसल्याचे कळले. कॉन्व्हेंट सुरू होऊन दीड महिना होत असताना एवढ्या काळात मात्र शिक्षण विभागाने नोटशीट तयार करून सही का घेतली नाही, असा प्रश्न येथे पडत आहे. आता मात्र झालेल्या चुकीवर पडदा टाकण्यासाठी साहेबांच्या सहीचे कारण पुढे करून शिक्षण विभाग हात काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही बोलले जात आहे.
स्वातंत्रदिनी गणवेश नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 11:55 PM
स्वातंत्र्यदिनीही नगर परिषदेच्या कॉन्व्हेंटमधील विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
ठळक मुद्देआश्वासन ठरले फोल : कॉन्व्हेंटचे विद्यार्थी गणवेशाविनाच