शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
3
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
4
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
5
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
7
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
8
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
9
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
10
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
11
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
12
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
13
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
14
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
16
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
17
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

अपक्षांनी वेगळी चूल मांडल्याने सत्तेचे समीकरण बदलणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2022 5:00 AM

गोंदिया जिल्हा परिषद एकूण ५३ सदस्यीय आहे. या निवडणुकीत भाजपचे २६, काँग्रेस १३, राष्ट्रवादी काँग्रेस ८, चाबी ४, अपक्ष २ सदस्य निवडून आले. सत्ता स्थापन करण्यासाठी २७ सदस्यांची गरज आहे. जे दोन अपक्ष सदस्य निवडून आले आहेत, ते भाजपच्या विचारधारेचे आहे. त्यामुळे या दोन सदस्यांचा मदतीने भाजप सहजपणे जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, अपक्ष सदस्यांनी वेगळी भूमिका घेतल्याने भाजपची अडचण थोडी वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  मागील महिन्यात जिल्हा परिषद निवडणुका पार पडल्या. यात सर्वाधिक २६ जागा जिंकत भाजप हा सर्वांत मोठा पक्ष ठरला. मात्र, जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी २७ या मॅजिक फिगरची गरज आहे. दोन अपक्ष सदस्यांच्या मदतीने ते गाठणे भाजपला शक्य होते; पण दोन अपक्ष सदस्यांनी वेगळी चूल मांडल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचे समीकरण बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे.गोंदिया जिल्हा परिषद एकूण ५३ सदस्यीय आहे. या निवडणुकीत भाजपचे २६, काँग्रेस १३, राष्ट्रवादी काँग्रेस ८, चाबी ४, अपक्ष २ सदस्य निवडून आले. सत्ता स्थापन करण्यासाठी २७ सदस्यांची गरज आहे. जे दोन अपक्ष सदस्य निवडून आले आहेत, ते भाजपच्या विचारधारेचे आहे. त्यामुळे या दोन सदस्यांचा मदतीने भाजप सहजपणे जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, अपक्ष सदस्यांनी वेगळी भूमिका घेतल्याने भाजपची अडचण थोडी वाढली आहे. त्यामुळे भाजप आता आमदार विनोद अग्रवाल यांच्या चाबी संघटनेची मदत घेत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करणार असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे; पण याला भाजप व विनोद अग्रवाल यांनीसुद्धा कुठलाच दुजोरा दिला नाही, तर दुसरीकडे गोंदिया जिल्हा परिषदेचा इतिहास पाहता मोठा पक्ष सत्तेपासून दूर राहिला आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक २० जागा जिंकूनही त्यांना सत्तेपासून वंचित राहावे लागले होते. काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत जाण्याऐवजी कमळ हातात घेत पाच वर्षे सत्ता उपभोगली हे जिल्हावासीयांनी अनुभवले आहे, तर यावेळेस या सर्वच प्रमुख राजकीय पक्षाचे नेते काय भूमिका घेतात हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भाजपला जि.प.च्या सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, चाबी आणि अपक्ष सदस्य एकत्रित येत सत्तेचे नवीन समीकरण तयार करण्याची शक्यता वर्तविली जात आहे; पण हे जर तर पुरतेच मर्यादित आहे. 

२५ फेब्रुवारीपूर्वी होणार अध्यक्षाची निवड - जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड ही २५ फेब्रुवारीच्यापूर्वी होण्याची शक्यता आहे. जि.प.अध्यक्ष पदासाठी भाजपकडून सध्या संजय टेंभरे आणि डॉ. लक्ष्मण भगत यांच्या नावाची चर्चा आहे; पण भाजपचे पार्लमेंटरी बोर्ड नेमका काय निर्णय घेतो हेदेखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद