प्रमुख पाहुणे म्हणून समादेशक जावेद अन्वर, पोलीस निरीक्षक के.बी. सिंह, पोलीस निरीक्षक एच.आर. सिंह, पोलीस निरीक्षक एस.जी. हिरपूरकर आदी उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त सर्वप्रथम हर्ष फायर परेड घेण्यात आली. हर्ष परेडचे आयोजन प्रभारी समादेशक सहायक विनोद राय यांनी केले तर संचलन पोलीस उपनिरीक्षक जे. के. राय यांनी केले. परेडमध्ये कंपनी क्रमांक १चे नेतृत्व पोलीस उप निरीक्षक शेडमाके यांनी तर कंपनी क्रमांक २चे नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक चौधरी यांनी केले. त्याचप्रमाणे निशान टोळीचे नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक धुडसे यांनी केले. परेड संचलनानंतर विशेष कामगिरी करणारे पोलीस अधिकारी-अंमलदार यांना समादेशकांच्या हस्ते पुरस्कार व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. हर्ष परेडनंतर गट रुग्णालयात डॉक्टर कोकुडे यांच्या नेतृत्वात पोलीस अधिकारी-अंमलदार व त्यांच्या कुटुंबीयांकरिता वैद्यकीय शिबिर घेण्यात आले. यामध्ये स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. स्मिता वैद्य, जनरल फिजिशियन डॉ. पांडे यांनी आपली सेवा दिली.
भारत बटालियनचा वर्धापन दिन साजरा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 4:32 AM