शहरं
Join us  
Trending Stories
1
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
2
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
3
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
5
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
6
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
7
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
8
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
9
अदानी मुद्द्यावर 'इंडिया आघाडीत' फूट? टीएमसीने काँग्रेसला फटकारले
10
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
11
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
12
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
13
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
14
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
15
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...
16
अखेर विकी कौशलच्या 'छावा'ची रिलीज डेट जाहीर! २०२५ मध्ये या खास दिवशी रिलीज होणार सिनेमा
17
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
18
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
19
Finally Divorced... ऐश्वर्या आणि धनुष यांच्या घटस्फोटाला 2 वर्षानंतर कोर्टाकडून मान्यता
20
खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी

इंदोरा बु. आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात

By admin | Published: September 09, 2014 11:47 PM

येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व त्याअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामध्ये अनेक कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. याशिवाय अनेक समस्यांच्या विळख्यात हा आरोग्य केंद्र सापडला आहे.

मुरलीदास गोंडाणे - इंदोरा/बुज.येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व त्याअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामध्ये अनेक कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. याशिवाय अनेक समस्यांच्या विळख्यात हा आरोग्य केंद्र सापडला आहे. या केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून व्ही.आर. आईटवार कार्यरत आहेत. सदर केंद्रांतर्गत नऊ उपकेंद्रांचा समावेश असून ३३ कर्मचारी कार्यरत आहेत. यात पाच आरोग्य सेवकांची पदे रिक्त असून आरोग्य सहायकाचे एक पद रिक्त आहे. तसेच चार परिचारिकांची पदे मंजूर असून केवळ तीनच परिचारिका कार्यरत आहेत. एक वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. ही पदे भरण्यात आली नसल्याने केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमधील नागरिकांना आरोग्य सेवेपासून वंचित रहावे लागते.शासनामार्फत या आरोग्य केंद्रात सहा खाटा मंजूर असून तशी व्यवस्था आहे. जेव्हा महिला प्रसुतीसाठी व कुटूंब कल्याणसाठी भरती झाल्यावर शस्त्रक्रियेनंतर जागेअभावी खाटा लावता येत नाही. प्रयोगशाळेची नवीन इमारत पावसामुळे गळत आहे. या खोलीमध्ये विजेची सोय नसल्याने औषधी वितरण कक्षात प्रयोगशाळेचा टेबल ठेवला आहे. महिलांसाठी नवीन वार्ड तयार करण्यात आला असून त्या ठिकाणी स्लॅब गळत आहे.या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वाहन मागील एक महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे रूग्णांना ने-आण करण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या महिलांना वाहनाअभावी मोठाच त्रास होतो. त्यासाठी तालुका स्तरावरून वाहन मागविण्यात येते. प्रसूतीसाठी दाखल महिलांना तीन दिवसपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्राकडून जेवन दिले जाते. मात्र शस्त्रक्रियेच्या रूग्णांना आहार द्यावे, असे असतानाही येथील सुविधेअभावी आहार दिले जात नाही. मलेरिया, डेंग्यूची तपासणी सध्या सुरू असून पी.एफ. सकारात्मक असल्यास त्यावर तत्काळ औषधोपचार केला जातो. मात्र पाच आरोग्य सेवकांच्या कमतरतेमुळे रूग्णांना त्रास सहन करावा लागतो. या आरोग्य केंद्रात सोलर वॉटर सिस्टम बंद अवस्थेत आहे. जे उपकरण होते ते माकडांच्या हैदोसामुळे तुटले आहे. तेव्हापासून ते दुरूस्त करण्यात आले नाही. रूग्णांना पिण्याचे गरम पाणी मिळत नाही. त्यामुळे प्रसूत मातांना त्रास सहन करावा लागतो. या आरोग्य केंद्रात महिला वार्डांची कमतरता, ही मोठी समस्या आहे. महिलांचा एकच वार्ड असल्यामुळे प्रसूत व शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलांना झोपण्याचा त्रास होतो. तसेच पुरूषांचासुद्धा एकच वार्ड असल्याने रूग्णांची गैरसोय होते. कर्मचाऱ्यांच्या राहण्यासाठी येथे क्वॉर्टर उपलब्ध असून संबंधित मुख्यालयी राहत आहेत. आरोग्य केंद्राला भेट दिली असता वैद्यकीय अधिकारी हजर नव्हते. आरोग्य सहायिका कांबळे उपस्थित होत्या. त्यांना विचारल्यावर अधिकारी गोंडमोहाळी येथे गेल्याचे सांगितले.