कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असल्यामुळे, नागरिकांनी मास्क लावणे, सामाजिक अंतर पाळणे व वारंवार साबणाने हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे, ही त्रिसूत्री सर्व नागरिकांनी पाळावी व स्वतःचे कोरोना संसर्गापासून संरक्षण करावे, असे वैद्यकीय अधिकारी डॉ.श्वेता कुलकर्णी डोंगरवार यांनी सांगितले. सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ.आरती काळे, आरोग्यसेविका खराबे, कातवले, वाहक उरकुडे यांनी सेवा दिली. सिरेगावबांध ग्रामपंचायतचे सरपंच इंजिनीअर हेमकृष्ण संग्रामे यांनी सहकार्य केले. आरोग्यवर्धिनी केंद्र चान्ना बाकटीच्या वतीने आरोग्यवर्धिनी उपकेंद्र पिंपळगाव व सिलेझरी येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र शनिवारी सुरू करण्यात आले. सिलेझरी आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात १२० तर पिंपळगाव उपकेंद्रात ७० असे एकूण दोनशे महिला-पुरुषांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली, अशी माहिती डॉक्टर कुलकर्णी यांनी दिली आहे. या लसीकरण केंद्रांवर वैद्यकीय अधिकारी डॉ.श्वेता कुलकर्णी डोंगरवार यांच्यासह डॉ.कुंदन कुलसुंगे, आरोग्य सहायक भारद्वाज, आरोग्यसेवक सातारे, आरोग्य तंत्रज्ञ साखरे, आरोग्यसेविका शिंदे, राजगिरे, चौबे, कोडापे, पेंदाम, आरोग्यसेवक दोनोडे, राऊत, शिक्षक कीर्ती मेश्राम, हंसराज खोब्रागडे यांनी सेवा दिली. सरपंच ब्राह्मणकर, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक आरोग्यसेविका, आशा कार्यकर्त्या यांनी या शिबिरांना सहकार्य केले.
सिरेगावबांध येथे आढळला एक कोरोना बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 4:26 AM