कीटकनाशक निष्फळ : एकाच वेळी अनेक रोगांचा हल्लासालेकसा : यंदा एकूण पडलेल्या पावसात गोंदिया जिल्ह्यातील इतर तालुक्यापेक्षा सालेकसा तालुक्यात सर्वाधिक पर्जन्यमान नोंदविण्यात आले आहे. याचा फायदा अनेक ठिकाणी धानपिकांवर झालेला आहे. त्यामुळे सुरुवातीला रोवणी करण्यात आलेल्या शेतीत भरघोष उत्पादन होण्याची चित्रे दिसत आहेत. परंतु काही शेतामध्ये धानावर अनेक प्रकारच्या किडीने हल्ला चढवला असल्यामुळे तालुक्यात शेकडो हेक्टर शेतीत धानपीक येण्यापुर्वीच तणाचे तणीस झाल्याचे चित्र दिसत आहेत. काही शेतकऱ्यांच्या संपुर्ण शेतीवर सरसकट किडींचा हल्ला सुरु झाला आहे. त्यामुळे त्यांना धानपीक प्राप्त करुन घरी आणता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शेतकरी धास्तावले आहेत. तालुक्याच्या कावराबांध झालीया धानोली साकरीटोला परिसरात तसेच उन्हाळी धानपीक घेण्यात आलेल्या शेती पिरसरात धान पिकांवर एवढा किंडीचे आक्रमक झाले की शेतकरी सतत किटकनाशक फवारणी करीत आहेत. रोगावर नियंत्रण करण्यात अपयशी होत आहे. खोडकिडी, मावा तुडतुडा, बेरडी फक्त इत्यादी रोगांचे सारखे आक्रमक झाल्याने पाने गुंडाळणारी अळी, तणाला पोकळ करणारी अळी, पाने खाणारी अळी इत्यादी अनेक प्रकारच्या अळ्या सारख्या हल्ला करीत आहेत. ऐनवेळी कोणती अळी आक्रमण केल्याने हातात येणारे पिक नष्ट होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)पिकांचे सर्वेक्षण कराअनेक शेतकऱ्यांनी रोगग्रस्त झालेल्या शेतातील पिकांचे सर्वेक्षण करुन शासनाने मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बबलू कटरे, लक्ष्मण नागपूरे यांच्या नेतृत्वात अनेक शेतात प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यात त्यांना पिकांची दयनीय अवस्था आढळून आली. महसूल विभागाने पाहणी करुन अहवाल सादर करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.योग्य मार्गदर्शन व नियोजन हवेधानपिकावर रोगांवर किंवा रोग होण्यापुर्वी शेतकऱ्यांनी अपेक्षित उत्पादन घेण्यासाठी योग्य मार्गदर्शन घेवून शेतीचे नियोजन करावे. खोडकिडीचा प्रभाव झाल्यास वरुन कितीही फवारणी केली तरी ते किड मरत नाही. कारण ते कीड बुडात तनाच्या आत असते. धानाची कापणी जमिनीला लागून झाल्यास दुसऱ्या हंगामात खोडकिडीचा प्रभाव कमी पडतो. नर्सरी रोवणी च्या पुर्वी सुरुवातीलाच थायमेट सारखी औषधी टाकावी. काही मिळ किड असतात. ते किडीच्या अळी खातात म्हणून ते मरुन नये अशी औषधी टाकू नका. कृषी विभागाचा सल्ला घेवून औषधी फवारणी करा’’- टी.एस. तुरकर, कृषी सहायक
धान पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव
By admin | Published: October 07, 2015 12:27 AM