लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : येथील प्रभाग क्रमांक-१ मध्ये बसस्थानक परिसरातील ८ वर्षीय मुलीला मलेरिया झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे कोरोना त्यापाठोपाठ मलेरियाचा आजार परिसरात बळावतो की काय? अशी शंका निर्माण झाली आहे. साथरोग नियंत्रण करण्यासाठी आरोग्य विभाग व ग्रामपंचायतने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.येथील बसस्थानक परिसरातील हॉटेल व्यवसायीकांच्या मुलीला मलेरिया झाल्याचे निष्पन्न झाले असून त्या मुलीवर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरु आहे. परिसरातील काही गावांमध्ये सुद्धा ५-७ मलेरिया रूग्ण निघाल्याची माहिती आहे. त्यामुळे गावात मलेरियाची साथ तर पसरणार नाही ना? अशी शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे. आता पावसाला सुरुवात झाल्यामुळे मलेरिया, डेंगू व चिकनगुनिया यासारखे साथीचे रोग पसरण्याचा धोका संभावतो.परिसरातील पवनीधाबे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात काही दिवसांपूर्वी मलेरियाची लागण झालेल्या २ रूग्णांनी उपचार घेतला होता, हे येथे उल्लेखनीय आहे. साथीच्या रोगाची बाधा नागरिकांना होऊ नये व ती गावात पसरू नये यामुळे प्रतिबंधासाठी ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने डिडीटी फवारणी व डास प्रतिबंधक उपाययोजना तातडीने कराव्यात अशी मागणी गावकºयांनी केली आहे.तर घराचा परिसर स्वच्छ ठेवावा, परिसरात आजूबाजूला पाणी साठवून ठेवू नये, १ दिवस कोरडा दिवस पाळावा, टाकाऊ वस्तंूमध्ये पाणी साचू देऊ नय,े झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा, घराबाहेर डबक्यात साचलेल्या पाण्यात वाहनाचे जळालेले इंजिन आॅइल टाकावे, ताप, अंग- डोकेदुखी, उल्टी अशी लक्षणे दिसून आल्यास जवळच्या आशा सेविका, आरोग्य सेविका, आरोग्य कर्मचारी किंवा सरकारी दवाखान्याशी संपर्क करा असे पवनीधाबेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण मेंढे यांनी सांगीतले आहे.नवेगावबांध येथील मलेरियाचा एक रूग्ण बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे प्रभाग क्र मांक- १ मध्ये प्रतिबंधात्मक डासनाशक फवारणी ग्रामपंचायतच्यावतीने करण्यात आली आहे. गावात साथ पसरू नये म्हणून,जिल्हा हिवताप अधिकाºयांना डीडीटी फवारणीची मागणी केली आहे.-अनिरु द्ध शहारेसरपंच, ग्रामपंचायत नवेगावबांध
गावात मलेरियाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 5:00 AM
येथील बसस्थानक परिसरातील हॉटेल व्यवसायीकांच्या मुलीला मलेरिया झाल्याचे निष्पन्न झाले असून त्या मुलीवर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरु आहे. परिसरातील काही गावांमध्ये सुद्धा ५-७ मलेरिया रूग्ण निघाल्याची माहिती आहे. त्यामुळे गावात मलेरियाची साथ तर पसरणार नाही ना? अशी शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे. आता पावसाला सुरुवात झाल्यामुळे मलेरिया, डेंगू व चिकनगुनिया यासारखे साथीचे रोग पसरण्याचा धोका संभावतो.
ठळक मुद्देएक रूग्ण आढळला : उपाययोजना करण्याची गावकऱ्यांची मागणी