शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

माहिती तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक

By admin | Published: February 10, 2017 1:16 AM

आजचे युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे आहे. शासनाच्या अनेक लोककल्याणकारी योजना राबविताना यंत्रणांनी

विजयकुमार गौतम : विविध विषयांचा आढावा, विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची उपस्थितीगोंदिया : आजचे युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे आहे. शासनाच्या अनेक लोककल्याणकारी योजना राबविताना यंत्रणांनी त्याचा लाभ जलदगतीने व प्रभावीपणे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रगतीचा मार्ग प्रशस्त होण्यास होईल, असे प्रतिपादन पालक सचिव विजयकुमार गौतम यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात विविध विषयांचा आढावा घेताना गौतम बोलत होते. यावेळी प्रामुख्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहादूर तिडके, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अनिलकुमार श्रीवास्तव यांची उपस्थिती होती.विकासाच्या प्रक्रि येत ग्रामीण रस्ते चांगले असणे आवश्यक असल्याचे सांगून पालक सचिव गौतम म्हणाले, त्यामुळे परिवहन सेवा ग्रामीण भागात चांगल्या प्रकारे पोहोचविण्यास मदत होईल. सोबतच ग्रामीण विकासाला चालना मिळेल. गोंदिया जिल्हा निसर्गाने समृध्द आहे. जिल्ह्यात ज्या विविध समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे काम करण्यात येईल. जिल्ह्यात पर्यटन विकासाला भरपूर वाव आहे. त्यामुळे पर्यटनातून रोजगार क्षमता वाढण्यास देखील मदत होणार आहे.कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे जिल्ह्याची वाटचाल करावयाची असल्याचे सांगून गौतम पुढे म्हणाले, आधार नंबरची सांगड बँक खात्याशी घालून मोबाईलशी सुध्दा जोडण्यात यावे. लाभार्थ्यांना यापुढे विविध योजनांचा लाभ देताना आधार हा महत्वाचा घटक राहणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतला कॅशलेस व्यवहारासाठी मशीन देण्यात येणार आहे. येत्या दोन-तीन महिन्यात या मशीनचा व्यवहारात उपयोग होताना दिसणार आहे. आधार ते डिजिटल एकॉनॉमी करणारा राज्यातील पहिला जिल्हा हा गोंदिया राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. १ एप्रिलपासून सर्वप्रकारच्या शिष्यवृत्ती डीबीटी पोर्टलवर जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांना पॉश मशीन देण्यात येणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, जिल्ह्यात धडक सिंचन विहिरी कार्यक्रमांतर्गत दोन हजार विहिरी मंजूर झाल्या आहेत. या विहिरींची कामे देखील सुरू झालेली आहेत. या विहिरीतून शेतीच्या बारमाही सिंचनाचे नियोजन कृषी विभागाने करावे. रबी हंगामात देखील या शेतीतून जिल्ह्यातील शेतकरी नगदी पिकांची शेती करतील व त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत होईल. संपूर्ण जिल्हा मार्चपूर्वी हागणदारीमुक्त होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी पालक सचिव यांनी जिल्ह्यातील विविध समस्यांचा, अपूर्ण अवस्थेतील सिंचन प्रकल्पाचा आढावा घेतला. याप्रसंगी सभेला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)