शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
3
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
4
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
6
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
7
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
8
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
9
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
10
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

दूध कमी दराने खरेदी केल्याबाबत चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 10:00 PM

जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघामार्फत दुग्ध उत्पादकांना प्रत्येक लिटरमागे ५ रूपये ५० पैसे कमी दिले जात असल्याची तक्रार सहा सहकारी संस्थानी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

ठळक मुद्देकारवाईसाठी प्रकरण वरिष्ठांकडे : दुुग्ध उत्पादक संघाने आर्थिक अडचण दाखवून कमी केले दर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघामार्फत दुग्ध उत्पादकांना प्रत्येक लिटरमागे ५ रूपये ५० पैसे कमी दिले जात असल्याची तक्रार सहा सहकारी संस्थानी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. त्याबाबतच्या तक्रारीची चौकशी विभागीय उपनिबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) नागपूर यांनी सुरू केल्याची माहिती जल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांनी दिली आहे.जिल्ह्यात शासन, सहकारी व खाजगी दुग्ध डेअरीमार्फत जवळपास ४९ हजार लिटर दुुधाचे दररोज संकलन करण्यात येते. त्यापैकी गोंदिया जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघामार्फत एकूण ७८ दुग्ध उत्पादक सहकारी संस्था ८ हजार लिटर दूध दररोज संकलन करतात. हे संकलीत केलेले दूध शासकीय दूध योजना गोंदिया व शासकीय दूध शितकरण केंद्र कोहमारा येथे पुरवठा करण्यात येते. शासनाने गाईच्या दुधाकरीता ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ. गुणप्रतीच्या दुधाचा दर २७ रु पये प्रति लिटर व म्हशीच्या दुधाकरीता ६ फॅट व ९ एस.एन.एफ. गुणप्रतीच्या दुधाकरीता ३६ रु पये प्रति लिटर दर निश्चित केला आहे. जिल्हा दुग्ध संघामार्फत संकलीत होत असलेले दूूध शासन स्वीकारत आहे. शासनाने निर्धारीत केलेल्या दरानुसार दूध उत्पादक सहकारी संस्थांना दूधाचे दर देणे गोंदिया जिल्हा दूध संघास बंधनकारक आहे. परंतु गोंदिया दूध संघामार्फत दूध उत्पादक सहकारी संस्थांना शासनाने निश्चित केलेले प्रति लिटर दर २७ रूपये न देता २२ रूपये प्रती लिटर दूधाचे दर दिले जात असल्याची बाब जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांच्या लक्षात आली. दुग्ध उत्पादकांनी यासंदर्भात ३० जानेवारी २०१८ रोजी जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार गोंदिया जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघास दूध उत्पादकांना कमी दूध दर देत असल्याबाबतचा खुलासा सादर करा असे पत्र संघाला देण्यात आले होते.गोंदिया दुग्ध संघाने दिलेल्या माहितीत शासनाला पुरवठा केल्यानंतर उरलेले दूध महानंदला २० रु पये प्रति लिटर दराने विक्री केले आहे. त्यामुळे संघाला आर्थिक नुकसान होत असल्याचे सांगूने २१ डिसेंबर २०१७ पासून ३ रूपये प्रति लिटर आणि २४ जानेवारी २०१८ पासून २ रु पये प्रति लिटर दर कमी करण्यात आल्याचे स्पष्ट केले.संघाने दिलेली माहिती योग्य वाटत नसल्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अन्वये जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघावर कारवाई करण्यासाठी जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांनी हे प्रकरण विभागीय उपनिबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) नागपूर यांच्याकडे पाठविले आहे. शासनाने निश्चित केलेले प्रति लिटर दूधाचे दर दूध उत्पादकांना गोंदिया जिल्हा दुग्ध सहकारी संघ देत नसल्याचे १० डिसेंबर २०१७ रोजीच विभागीय उपनिबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) नागपूर यांना सांगितले. त्यांनी या संस्थेला कारणे दाखवा नोटीसही बजावले होते. दूध संघ आर्थिक अडचणीत व तोट्यात असल्यामुळे २५ जानेवारी २०१८ रोजी निबंधकांनी कलम ७९ अ (३) अंतर्गत बजावण्यात आलेल्या नोटीसवर दोन महिन्याची स्थिगती दिली होती. सदर स्थगितीची कालमर्यादा संपल्यावर गोंदिया जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या सर्व पदाधिकारी आणि संचालकांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७९ अ (३) अन्वये ९ एप्रिल २०१८ रोजी नोटीस काढून १९ एिप्रल रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती, अशी माहिती जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांनी दिली आहे. 

टॅग्स :milkदूध