शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पात वणव्याची चौकशी थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 4:28 AM

सडक-अर्जुनी : नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पातील नागझिरा व पिटेझरी येथील कक्ष क्रमांक ९७, ९८, ९९, १०० या परिसरात ...

सडक-अर्जुनी : नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पातील नागझिरा व पिटेझरी येथील कक्ष क्रमांक ९७, ९८, ९९, १०० या परिसरात ८ एप्रिल २०२१ रोजी आग लागली होती. आग विझविण्याच्या प्रयत्नात तीन वनमजुरांचा होरपळून मृत्यू झाला, तर गंभीररीत्या भाजलेल्या दोन वनमजुरांना नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यातील एकाचा १७ मे रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी अग्नी रक्षकांना आवश्यक कीट व सुरक्षा उपकरणे पुरविली नाहीत. तसेच फायर लाईनचे काम केले नाही. परिणामी आगीने आतापर्यंत चार वनमजुरांचा बळी गेला. या घटनेला एक महिना लोटूनही या घटनेची साधी चौकशी झालेली नाही. त्यामुळे अनेक शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. आग नेमकी कशामुळे व कुणामुळे लागली याचा उलगडा अजूनपर्यंत झाला नाही. एकंदरीत या प्रकरणाची चौकशी थंडबस्त्यात पडून आहे. त्यामुळे वरिष्ठ वन अधिकारी कुणाला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत.

मार्च ते जून दरम्यान प्रत्येक वर्षी आग लागण्याच्या घटना समोर येतात. उन्हाळ्यात आगीपासून वनांच्या संरक्षणासाठी वनक्षेत्र सभोवताल आणि वनक्षेत्रातील रस्त्याच्या बाजूचे गवत व लहान काटेरी झुडपे काढण्याचे काम डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत केले जाते. त्यास फायर लाईनचे काम तसेच आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी फायर वॉचरची फेब्रुवारी ते जूनपर्यंत रोजंदारीवर नेमणूक केली जाते; पण अग्नी रक्षकांना आवश्यक ती सुरक्षा उपकरणे उपलब्ध केली जात नाहीत. तसेच फायर लाईन दुरुस्तीची कामे वन अधिकारी आपल्या जवळपासच्या कंत्राटदाराचे नाव समोर करून थातुरमातुर काम मजुरांमार्फत केले जाते. मागील पाच वर्षांपासून शासनाच्या आलेल्या निधीची अफरातफर करून कंत्राटदाराला हाताशी धरून त्या रकमेची वाट लावली जाते. प्रत्येक वर्षी जंगलाला आग लागल्याच्या घटना घडतात. यादरम्यान गवत, काटेरी झुडपे, मोहफूल व तेंदूपत्ता संकलनाचे टेंडर झाल्यानंतर हे काम सुरू केले जाते.

नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्प राखीव क्षेत्रातील बफर झोन क्षेत्रात जाण्यास सक्त मनाई आहे. तरीही अज्ञात व्यक्ती जाऊन आग लावून पळून जाते तेव्हा वन्यजीव विभागाचे कर्मचारी व अधिकारी काय करतात. पिटेझरी येथील कक्ष क्रमांक ९७, ९८, ९९, १०० या परिसरात आग लागली होती. या घटनेला महिना लोटला आहे. आतापर्यंत या घटनेत चार मजुरांचा बळी गेला आहे. परंतु, वनविभागाकडून साधी चौकशी करण्यात आली नाही. त्यामुळे अनेक शंका-कुशंका पीडित कुटुंब व परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केल्या जात आहेत. एकंदरीत या प्रकरणी चौकशी थंडबस्त्यात पडून आहे. त्यामुळे वरिष्ठांनी या प्रकरणी लक्ष देऊन आग कशामुळे लागली याची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली जात आहे.