प्रकरण मांसाहार पार्टीचे : चौकशीनंतर कारणे दाखवा नोटीससालेकसा : तालुक्यातील तिरखेडी केंद्रांतर्गत शिक्षकाच्यात केंद्र संमेलनात केलेल्या भोजन व्यवस्थेत मटन पार्टी व ओली पार्टी करण्यात आली. या पार्टीचे वृत्त पसरताच तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश गटशिक्षणाधिकारी वाय.सी. भोयर यांनी दिले आहे. चौकशी पूर्ण झाल्यावर संबंधित शिक्षकांना आणि त्या केंद्रातील अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल व त्या अनुषंगाने पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती भोयर यांनी लोकमतला दिली आहे.१६ एप्रिलला तिरखेडी केंद्राचे शैक्षणिक केंद्र संमेलन शिकारीटोला येथे आयोजित करण्यात आले होते. हे गाव घनदाट जंगल पढिरसरात मानागड तलावानजीक असून शाळेत केंद्र संमेलन संपल्यानंतर मानागढ तलावाच्या पायथ्याशी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. यात मटन मच्छी व मद्य प्राशनाची सोय असल्याची माहिती मिळाल्यावर काही जागरूक लोकांनी तिथे हजेरी लावली. त्यामुळे शिक्षकामध्ये व शिक्षण विभागात एकच खळबळ माजली.या प्रकरणाची माहिती गटशिक्षणाधिकारी वाय.सी. भोयर यांना मिळाल्यानंतर सदर प्रकरणाच्या चौकशीसाठी शिक्षण विस्तार अधिकारी एन.पी. चिखलोंढे आणि के.एस. धुवाधपाडे यांना त्या केंद्रात पाठविले व पार्टीत सम्मिलीत शिक्षकांशी भेट घेवून तसेच शिकारीटोला येथील मुख्याध्यापकांशी सखोल चौकशी घेण्याचे आदेश दिले. चिखलोंढे आणि धुवाधपाडे यांनी त्या केंद्रातील केंद्र प्रमुख एस.जे. जोगी आणि काही शिक्षकांशी भेट घेतली असता त्यांनी सांगितले की भोजनाची व्यवस्था शिकारीटोला आणि पथरुटोला येथील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी केली होती. यात जवळपास २५ ते २६ शिक्षक सहभागी झाले होते. त्यात दोन तीन शिक्षिका सुद्धा सहभागी होत्या, असे सांगितले. शनिवारी (दि.१८) चौकशीचे का काम पूर्ण झाले नाही. पुढील चौकशीची कारवाई सोमवारला पूर्ण केल्यानंतर कारणे दाखवा नोटीस व योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती वाय.सी. भोयर यांनी दिली. एकूण शिक्षकांनी अशा पद्धतीने मांसाहार किंवा मद्यप्राशन करावे याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश
By admin | Published: April 19, 2015 12:49 AM