शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

कृषी सहसंचालकांकडून सिमेंट बंधाऱ्याचे निरीक्षण

By admin | Published: June 14, 2017 12:44 AM

तालुका कृषी अधिकारी कार्यालय अर्जुनी-मोरगावच्या वतीने पिंपळगाव-खांबी येथे बांधण्यात आलेल्या दोन नवनिर्मित

कृषी सहसंचालकांकडून सिमेंट बंधाऱ्याचे निरीक्षण लोकमत न्यूज नेटवर्क बोंडगावदेवी : तालुका कृषी अधिकारी कार्यालय अर्जुनी-मोरगावच्या वतीने पिंपळगाव-खांबी येथे बांधण्यात आलेल्या दोन नवनिर्मित सिमेंट बंधाऱ्यांच्या कामाची पाहणी विभागीय कृषी सहसंचालक विजय धावटे यांन केली. तसेच बांधकामाबद्दल समाधान व्यक्त केला. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने जलयुक्त शिवार अभियानमध्ये समाविष्ट असलेल्या पिंपळगाव-खांबी येथे गट क्रमांक १/५ व १/६ या दोन ठिकाणी नाल्याला अडवून सिमेंट बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. परिसरातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात पाण्याची अडचण भासू नये म्हणून युद्धस्तरावर दोन्ही बंधाऱ्यांचे बांधकाम उत्कृष्ट दर्जामध्ये पूर्ण करण्यात आले. शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या दोन्ही सिमेंट बंधाऱ्याच्या बांधकामाची पाहणी विभागीय कृषी सहसंचालक विजय धावडे यांनी केली. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, प्रकल्प संचालक (आत्मा) हिंदूराव चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी नंदकिशोर नाईनवार, तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, मंडळ कृषी अधिकारी एन.एम. मुनेश्वर, संजय रामटेके, कृषी पर्यवेक्षक आर.के. चांदेवार, कृषी सहाय्यक विश्वनाथ कवासे, अविनाश हुकरे उपस्थित होते. ५० हेक्टर जमीन होणार ओलीत नव्याने बांधण्यात आलेल्या दोन्ही बंधाऱ्यामुळे नजीकच्या ५० हेक्टर शेतजमीनपर्यंतचे संरक्षित ओलीत होऊन भुजल पातळीमध्ये वाढ होणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी तुमडाम यांनी भेटीदरम्यान विभागीय कृषी सहसंचालकांना दिली. पाण्याची साठवण क्षमता वाढल्याने शेतीसह गुरा-ढोरांना पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे.