शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

व्याज अन् विलंब आकार माफ होणार; थकबाकीमुक्ती संधीला उरले ६८ दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 5:13 PM

महावितरणची 'अभय' योजना : कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या वीज ग्राहकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांना केवळ मूळ थकबाकीची रक्कम एकरकमी किंवा सहा हप्त्यांत भरणा करून थकबाकीमुक्ती व पुनर्वीजजोडणीची संधी महावितरणच्या अभय योजनेतून उपलब्ध झाली आहे. संपूर्ण व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ होणाऱ्या या योजनेचा जिल्ह्यातील ग्राहक लाभ घेत आहेत. वीजबिलांच्या थकबाकीमुळे ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी महावितरण अभय योजना ९१ दिवसांसाठी म्हणजे १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत राबवत आहे. आता या योजनेच्या कालावधीला ६८ दिवस शिल्लक आहेत.

कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वीज ग्राहकांसाठी ही योजना आहे. तसेच मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास त्यात लघुदाब ग्राहकांना आणखी १० टक्के, तर उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के सूट मिळत आहे किंवा मूळ थकबाकीची सुरूवातीला ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम व्याजमुक्त सहा हप्त्यांत भरण्याचीदेखील सोय आहे. 

येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत ही योजना राबविली जाणार असून, यासाठी आता ६८ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे अशात थकबाकी असलेल्या वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेऊन वीज जोडणी करून घ्यावी व योजनेला लाभ घ्यावा, असे कार्यकारी अभियंता शैलेश कांबळे यांनी कळविले आहे. 

मागणीनुसार नवीन वीज जोडणीचा लाभ वीजबिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलल्यानंतरही नवीन जागा मालक किंवा ताबेदार यांना थकबाकीची रक्कम भरावी लागेल, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे जागा वापरात असो किंवा नसो, वीजबिलांच्या थकबाकी- मधून मुक्त होण्याची संधी महावितरणकडून देण्यात आली आहे. तसेच वीज ग्राहकांना मागणीनुसार नवीन वीज जोडणी देण्यात येत आहे.

२०,४१० ग्राहक पात्र जिल्ह्यात या योजनेंतर्गत २० हजार ४१० वीज ग्राहक पात्र आहेत. त्यांच्यावर १२ कोटी ७७ लाख रुपये एवढी मूळ थकबाकी आहे तर त्यावर एक कोटी ९८ लाख रुपये व्याज आणि विलंब आकार आहे. या ग्राहकांना योजनेचा लाभ घेऊन थकबाकीमुक्त होण्याची चांगली संधी आहे

"महावितरणची वेबसाइट व मोबाइल अॅपद्वारे योजनेत सहभागी होण्याची व थकबाकी भरण्याची सोय उपलब्ध आहे. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी नजीकच्या महावितरण कार्यालयात संपर्क साधावा." - पुष्पा चौहान, मुख्य अभियंता, गोंदिया परिमंडळ

 

टॅग्स :electricityवीजgondiya-acगोंदिया