गोंदिया : खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा मानसिक आणि शारीरिक विकास होतो. आज अभ्यासाप्रमाणेच क्रीडा क्षेत्रातूनही आपले भविष्य बनविता येते. करिता अभ्यासासह क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा व जिल्ह्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडून जिल्ह्याचा नाव लौकिक व्हावा, असे प्रतिपादन आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.
जिल्हा क्रिकेट असोसिएशन व महाराष्ट्र राज्य बॉल क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्तवतीने आमगाव येथील भवभूती महाविद्यालयाच्या मैदानात आयोजित १० व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद मॉनटेक्स बॉल क्रिकेट स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी शनिवारी (दि.२०) ते बोलत होते. पाहुणे म्हणून तालुका क्रीडा अधिकारी राजेंद्र शिंदे, भवभूती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम भुस्कुटे, संघटनेचे राज्य सचिव दुलीचंद मेश्राम, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय बहेकार, सचिव महेश उके, जे.जे. लोखंडे, अजय खेतान, नंदू कोरे, जगदीश चुटे, उज्वल बैस, रामेश्वर शामकुवर, नरेश रहिले, नरेश येटरे उपस्थित होते.
संचालन रामभरोस चक्रवर्ती यांनी केेले. प्रास्ताविक दुलीचंद मेश्राम यांनी मांडले. आभार अमित मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमासाठी आयोजक नरेश बोहरे, गावित कोसरकर, दुर्गाप्रसाद मेश्राम, अर्जुन पटले, आकाश पटले, ओंकार नागफासे, कपिल कोल्हटकर, निखिल डोंगरे, सोमेश्वर कांडेकर, स्वप्नील ठाकरे, पुरुषोत्तम बागडे, सचिन बावनकर यांनी सहकार्य केले.