अध्यक्षस्थानी न्यायाधीश विक्रम आव्हाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. राजकुमार भगत, वकील संघाचे ॲड. डी. एस. बन्सोड उपस्थित होते. याप्रसंगी ॲड. बन्सोड यांनी, युवा विद्यार्थांना जीवनात यश कसे संपादन करावे याबाबत मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. भगत यांनी, लोकशाही बळकट करण्यात युवा वर्गाचा कसा सहभाग असावा, तसेच युवकांसमोरील आव्हाने यशस्वीरीत्या कशी पेलावी यावर मार्गदर्शन केले. न्या. आव्हाड यांनी हा दिवस आपण का साजरा करीत आहोत? तसेच युवा पिढी सशक्त भारत बनविण्यासाठी काय करू शकते? स्वामी विवेकानंदाचे युवकांप्रती असलेले विचार, तसेच युवकांचे हक्क व अधिकार याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन करून आभार ॲड. सुरेश गिऱ्हेपुंजे यांनी मानले. कार्यक्रमाला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक वर्ग व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
न्यायालयात आंतरराष्ट्रीय युवा दिन उत्साहात ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 4:34 AM