लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अलीकडे इंटरनेट, ब्रॉड बॅन्डचा वापर करणाºयांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. इंटनेट व ब्रॉड बॅन्डचे कनेक्शन देणाºया विविध कंपन्या बाजारपेठेत सक्रीय आहेत. मात्र इंटनेट सुविधा पुरवठा करण्याचा परवाना नसलेल्या चार खासगी कंपन्या गोंदिया कार्यरत आहे. त्यांनी आत्तापर्यंत शहरात दोनशेच्यावर इंटरनेट, ब्राड बॅन्डच्या जोडण्या करुन दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.इंटनेट व ब्रॉड बॅन्डचे कनेक्शन देणाºया कंपन्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे. ग्राहकांना कमी दरात चांगली सेवा देण्याचे प्रलोभन देऊन इंटरनेट जोडण्याकरुन दिल्या जात आहे. यात काही नामाकिंत कंपन्याचा समावेश आहे. मात्र याचाच फायदा काही खासगी कंपन्या सुध्दा घेत असल्याचे चित्र आहे.या कंपन्या ग्राहकांना इंटनेट व ब्रॉड बॅन्डच्या अत्यंत कमी दरात जोडण्या करुन देत आहे. त्यामुळे ग्राहक सुध्दा त्याला बळी पडत आहे. कोणत्याही खासगी इंटनेट व ब्राड बॅन्डची सुविधा देणाºया कंपन्याना केंद्रीय माहिती व सूचना प्रसारण मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी संबंधीत कंपनीकडे कंपनी परवाना, व्यवसाय परवाना, बँकेचे हमी प्रमाणपत्र, जीएसटी क्रमांक आदी गोष्टी असणे आवश्यक आहे. सर्वात म्हणजे ही सुविधा पुरवठा करण्यासाठी इंटरनेट सव्हिर्स प्रोव्हाईडर (आयएसपी) परवाना घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय इंटनेट व ब्रॉड बॅन्डचे कनेक्शन देता येत नाही. मात्र गोंदिया येथे मागील तीन ते चार महिन्यांपासून ही सुविधा पुरवठा करण्याचा कुठलाही परवाना नसलेल्या चार कंपन्या कार्यरत असल्याची माहिती आहे.या चारही कंपन्यांनी आत्तापर्यंत शहरात दोनशेहुन अधिक ग्राहकांना इंटरनेट जोडणी करुन दिल्याची माहिती आहे. दरम्यान या प्रकारामुळे जिल्ह्याच्या सुरक्षा व्यवस्थेला सुध्दा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोंदिया जिल्हा नक्षलप्रभावीत असून याचा गैरफायदा घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.काही महिन्यांपूर्वी जळगाव जिल्ह्यात सुध्दा नियमबाह्य सबस्टेशन सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. दरम्यान या प्रकारामुळे जिल्ह्याच्या सुरक्षा व्यवस्थेला सुध्दा तडा जाण्याची शक्यता नाकारता नाही.विशेष म्हणजे या सर्व प्रकारापासून दूरसंचार विभाग अनभिज्ञ असल्याची माहिती आहे.व्यावसायिकांमुळे प्रकार उघडकीसगोंदिया शहरात मागील तीन चार महिन्यांपासून इंटनेट व ब्रॉड बॅन्डचे कनेक्शन देणाºया चार खासगी कंपन्या कार्यरत आहे. त्यांच्याकडे ही सुविधा पुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेले कुठलेच प्रमाणपत्र उपलब्ध नाही. शिवाय कंपन्याची माहिती दूरसंचार विभागाच्या अधिकाºयांना सुध्दा नसल्याची माहिती आहे. दरम्यान या व्यवसायात काम करणाºया काही सुज्ञ व्यावसायीकांच्या निदर्शनास हा सर्व प्रकार आला. त्यांनी याची अधिक चौकशी केली असता या कंपन्याकडे परवाना नसल्याची बाब पुढे आली.
परवाना नसलेल्या कंपन्यांकडून इंटरनेट जोडण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 12:22 AM
अलीकडे इंटरनेट, ब्रॉड बॅन्डचा वापर करणाºयांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. इंटनेट व ब्रॉड बॅन्डचे कनेक्शन देणाºया विविध कंपन्या बाजारपेठेत सक्रीय आहेत.
ठळक मुद्देचार खासगी कंपन्या सक्रीय : सुरक्षा व्यवस्थेला धोका, दूरसंचार विभाग अनभिज्ञ