लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : शहरापाठोपाठ आता इंटरनेटचा वापर खेड्यापाड्यातही मोठ्या प्रमाणात होत आहे. दिवसेंदिवस अँड्रॉईड मोबाईलची वाढती क्रेझ प्रत्येक घराघरात आली आहे. याची भुरळ आता ग्रामीण भागातील लोकांना घालत आहे. अगदी पहिली ते दुसरी वर्गापासूनच्या तर मोठ्यापर्यंत मुलांकडे अँड्रॉईड मोबाईल दिसून येत आहेत. लहान मुले मात्र १० ते २० रुपयांचे रिचार्ज मारताना दिसत आहेत.ग्रामीण भागात प्रचलित असलेले मैदानी खेळ आता इतिहासजमा होत आहेत. सोबतच समाजाशी एकरुप असलेला वर्ग समाजापासून दूर जात आहे असेही वाटत आहे. मुलांना शाळेत सांगितलेला प्रकल्प मुले नेटवर सर्च करून सोडविताना दिसतात. मुळात प्रकल्प म्हणजे मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा. त्यात विचार करायला भाग पाडणे प्रत्यक्षात लोकांच्या भेटीगाठी घेऊन त्याविषयी चौकशी करून त्याने तो प्रकल्प तयार करावा असे असताना ग्रामीण भागातील मुले नेटवर सर्व करून शाळेतील प्रकल्प पूर्ण करताना दिसतात. तासन्तास नेट सर्फींग करून तो समाजापासून दूर जाताना दिसतो आहे.या प्रकल्पामुळे समाज संस्कृतीपासून दुरावत आहे. उन्हाळ्याच्या सुट्या म्हणजे मामाचे गाव. आमराईतील डाबडबलीचे खेळ, मित्र सवंगी, फिरण्या बागडण्याचे दिवस. परंतु इंटरनेटच्या वेडापाई हे सर्व दुय्यम झालेले दिसून येत आहे. दिवसागणिक वाढत चाललेली इंटरनेरटचा वापर हा आपल्या संस्कृतीला देखील धोका पोहचू शकतो. खरे तर यांची सुरुवात आण केली. मुलांना या विषयी आकर्षण निर्माण करून देतो. त्यामुळे तो शांत होतो. या व अशा अनेक उदाहरणावरून आपणच आपल्या मुलांना मोबाईलचा वापर करण्यासंबंधी प्रोत्साहीत करीत असतो. जे आपल्याला जमले नाही ते त्याने केले असे म्हणून त्याची वाहवाह करतो. पण हे त्याला गरजेनुसार दिले पाहिजे.त्यासाठीच पालकांनी आपल्या आपल्या मुलाकडे लक्ष दिले पाहिजे. आपला मुलगा किती वेळा इंटरनेटचा वापर करतो व किती वेळा बाहेर फिरायला खेळायला जातो यावर लक्ष देणे गरजेचे आहे. तरच आपली संस्कृती आपण जपू व आपल्यासोबतच आपल्या पुढील पिढीशी नाळ देखील समाजाशी घट्ट करता येईल एवढे मात्र खरे.
खेड्यापाड्यातही वाढला इंटरनेटचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 10:06 PM
शहरापाठोपाठ आता इंटरनेटचा वापर खेड्यापाड्यातही मोठ्या प्रमाणात होत आहे. दिवसेंदिवस अँड्रॉईड मोबाईलची वाढती क्रेझ प्रत्येक घराघरात आली आहे. याची भुरळ आता ग्रामीण भागातील लोकांना घालत आहे. अगदी पहिली ते दुसरी वर्गापासूनच्या तर मोठ्यापर्यंत मुलांकडे अँड्रॉईड मोबाईल दिसून येत आहेत. लहान मुले मात्र १० ते २० रुपयांचे रिचार्ज मारताना दिसत आहेत.
ठळक मुद्देमैदानी खेळांबाबत उदासीनता : संस्कार शिबिरातून जागृती करणे गरजेचे