आॅनलाईन लोकमतगोंदिया : नवेगावबांध पर्यटनस्थळाची ओळख देशपातळीवर होईल अशा पद्धतीने हा भाग विकसीत करण्यात येईल. केवळ राज्यातीलच नव्हे तर देशभरातील पर्यटक येथे यावे, या दृष्टीकोनातून सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. या पर्यटनस्थळाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी ५० कोटी रुपयांचा निधी देण्यास तत्वत: मंजुरी दिली आहे. लवकरच याला मंजूरी देण्यात येणार आहे. नवेगाबबांधला प्रसिद्ध पर्यटन स्थळाची ओळख निर्माण करून देणार अशी ग्वाही पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी येथे दिली.नवेगावबांध जलाशयाजवळ बालोद्यान तयार करणे, चौकीदार कक्ष आणि बालोद्यानासमोर सौर ऊर्जा लाईट लावण्याच्या कामाचे भूमीपूजन रविवारी (दि.२१) करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून पं.स.सभापती अरविंद शिवणकर, सडक-अर्जुनी पं.स.सभापती गिरीधारी हत्तीमारे, माजी जि.प.सभापती उमाकांत ढेंगे, माजी पं.स.सभापती कविता रंगारी, जि.प.सदस्य तेजुकला गहाणे, पं.स.सदस्य रामलाल मुंगणकर, अर्चना राऊत, माजी जि. प. सदस्य रामदास कोहारकर, विजया कापगते, नवेगावबांधचे सरपंच अनिरुध्द शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, केवलराम पुस्तोडे, लायकराम भेंडारकर, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास बोरकर, नवेगावबांध फाउंडेशनचे अध्यक्ष विजय डोये, नितीन पुगलिया, नवल चांडक उपस्थित होते.बडोले यांनी, नवेगावबांध जलाशय परिसराचा सन १९७१ ते १९९१ हा काळ उत्कर्षाचा होता. त्यानंतर या परिसराच्या अधोगतीला सुरुवात झाली. नैसर्गिकदृष्टया संपन्न असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक यावे आणि स्थानिकांना यामधून रोजगार उपलब्ध व्हावा. यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. येत्या दोन वर्षात नवेगावबांध जलाशय परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने कायापालट करण्यात येईल असे सांगीतले. या वेळी रचना गहाणे, रामदास बोरकर यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सरपंच अनिरुध्द शहारे यांनी मांडले. आभार उपसरपंच रघुनाथ लांजेवार यांनी मानले.
नवेगावबांधची देशपातळीवर ओळख निर्माण करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 10:21 PM
नवेगावबांध पर्यटनस्थळाची ओळख देशपातळीवर होईल अशा पद्धतीने हा भाग विकसीत करण्यात येईल. केवळ राज्यातीलच नव्हे तर देशभरातील पर्यटक येथे यावे, या दृष्टीकोनातून सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल.
ठळक मुद्देराजकुमार बडोले : नवेगावबांध येथे बालोद्यानाचे भूमीपूजन