शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
3
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
4
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
5
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
6
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
7
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
8
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
9
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
10
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
11
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
12
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
13
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
14
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
15
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
16
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
17
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
18
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
19
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
20
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान

अवैध ई-तिकीट व्यवसायाचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2018 12:05 AM

रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने रेल्वेत ई-तिकीटाची अवैधरित्या खरेदी-विक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून काही ई-तिकीट व साहित्य जप्त करण्यात आले.

ठळक मुद्देऐजंट पोलिसांच्या हाती : संगणकासह साहित्य जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने रेल्वेत ई-तिकीटाची अवैधरित्या खरेदी-विक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून काही ई-तिकीट व साहित्य जप्त करण्यात आले.सोमवारी (दि.५) दुपारी २.३० वाजतादरम्यान रेल्वे सुरक्षा दलाचे गुन्हे शाखा प्रभारी निरीक्षक एस.दत्ता व उपनिरीक्षक एस.एस.बघेल यांनी आपल्या पथकासह रेलटोली स्थित एम.वी.टूर अँड ट्रॅव्हल्समध्ये तपासणी केली. या एजंसीचे संचालक नितीन वरू (५४) यांच्याकडे त्यांच्या पर्सनल युजर आईडीवरून बनविलेल्या रेल्वे ई-तिकीट जप्त केल्या. चौकशीत त्याने तो आईआरसीटीसीचा अधिकृत एजंट असल्याचे सांगीतले. आपल्या पर्सनल युजर आईडीशिवाय तो अतिरीक्त फायदा कमविण्यासाठी घोडा ४११, घोडा ४१५, घोडा ५२३, घोडा ४१० व घोडा ४३३ यासारख्या अन्य कित्येक नावांची बनावट आईडी बनवून ग्राहकांकडून प्रती प्रवासी १००-२०० रूपये प्रवास रकमेशिवाय अतिरिक्त घेत होता. विशेष म्हणजे, चौकशी व दुकानाचा तपास साक्षदारांच्या उपस्थितीत करण्यात आला. यादरम्यान, दुकानातून तत्काल तिकीट तयार करणाºया नितीन वरू यांच्या संगणकातून सुरक्षित पर्सनल आईडीने बनविलेल्या रेल्वे तिकीट जप्त केल्या. संगणकासह दुकानातून जप्त ई-तिकीटांच्या आधारावर रेल्वे अधिनियम कलम १४३ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रसंगी ९ लाईव ई-तिकीटा ज्यात रेल्वे प्रवास व्हायचा आहे (किंमत ७१७० रूपये), २ जुन्या प्रवासी तिकिटा ज्यात प्रवास झालेला आहे.(किंमत २४१५ रूपये), ४५ हजार ५०० रूपयांचा संगणक संंच जप्त करण्यात आला आहे. हे प्रकरण पुढील तपासाठी रेल्वे पोलिसांकडे देण्यात आले आहे. दरम्यान या कारवाईमुळे अवैध ई-तिकीट तयार करुन देणाºयाचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :railwayरेल्वे