शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
2
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
3
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
4
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
5
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
7
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
8
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
9
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
11
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
12
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
13
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
14
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
15
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
16
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
17
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
18
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
19
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?

अवैध दारू विक्रेत्यांवर गाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 10:30 PM

जिल्ह्यात होत असलेल्या अवैध दारू विक्रीवर आळा बसावा यासाठी जिल्हा पोलिसांनी शनिवारी (दि.१४) धाडसत्र राबविले. यामध्ये पोलिसांनी मोठ्या प्रमाणात देशी व मोहफुलाची दारू जप्त केली.

ठळक मुद्देपोलिसांचे धाडसत्र : मोठ्या प्रमाणात देशी व मोहफुलाची दारू जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात होत असलेल्या अवैध दारू विक्रीवर आळा बसावा यासाठी जिल्हा पोलिसांनी शनिवारी (दि.१४) धाडसत्र राबविले. यामध्ये पोलिसांनी मोठ्या प्रमाणात देशी व मोहफुलाची दारू जप्त केली.यांतर्गत, डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ग्राम सावंगी येथील विश्वजित गुलाब गेडाम (४५) याच्याकडून देशी दारूचे १८० मि.ली.चे चार पव्वे जप्त केले. दवनीवाडा पोलिसांनी सितूटोला-दासगाव येथील गणेश सुरजलाल टेकाम (३०) याच्याकडून मोहफुलाची २० लिटर दारु तर प्रकाश बाबुलाल टेकाम (४०) याच्याकडून हातभट्टीची २० लिटर दारू बलमाटोला येथून, पंचवटी- देवलगाव येथून तिरुपती बलराम तुसलीपार (३४) याच्याकडून देशी दारूचे १४ पव्वे जप्त केले. गोरेगाव पोलिसांनी ग्राम हिरडामाली येथील राजेश रामकृष्ण बन्सोड (३४) याच्याकडून हातभट्टीची पाच लिटर दारू, देशी दारूचे पाच पव्वे व दारु पिण्याचे साहित्य जप्त केले. दवनीवाडा पोलिसांनी लोधीटोला येथील सुंदरा हरिदास चन्ने (४५) याच्याकडून देशी दारूचे पाच पव्वे, परसवाडा येथील अनिता मुकेश मेश्राम (३७) हिच्याकडून हातभट्टीची पाच लिटर दारू जप्त केली.अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी बोंडगावदेवी येथील रामनाथ मोनू मेश्राम (४०) याच्याकडून देशी दारूचे सात पव्वे, चिचगड पोलिसांनी सुकडीटोला येथील धनीराम मेहतरलाल मडावी (३७) याच्याकडून मोहफुलाची पाच लिटर दारू जप्त केली. ग्रामीण पोलिसांनी ग्राम इर्री येथील संगिता जितेंद्र भालाधरे (४५) हिच्याकडून हातभट्टीची पाच लिटर दारू, पांढराबोडी येथील सुनील मुन्नालाल लिल्हारे (४५) याच्याकडून विदेशी दारूचे चार पव्वे जप्त केले. सालेकसा पोलिसांनी रामाटोला येथील फुलचंद रावजी पंधरे (५९) मोहफुलाची तीन लिटर दारू, सोनपुरी येथील भाग्यवंती सहसराम नागपुरे हिच्याकडून देशी दारूचे चार पव्वे जप्त केले. तिरोडा पोलिसांनी बेलाटी येथील संगीता राजेंद्र बडनाग (३२) हिच्या कडून हातभट्टीची १० लिटर दारु जप्त केली.तिरोडा पोलिसांनी शहरातील शास्त्री वॉर्डातील सिंधू शंकर डोळस (४८) हिच्याकडून हातभट्टीची १० लिटर दारू, कोडेलोहारा येथील दिशा अनिल मेश्राम (३४) हिच्या कडून हातभट्टीची १० लिटर दारू, वडेगाव येथील प्रकाश कपूरचंद बरियेकर (३२) याच्याकडून हातभट्टीची १५ लिटर दारू, मुंडीकोटा येथील कविता राजेश मालाधरे (४३) हिच्याकडून हातभट्टीची १५ लिटर दारू जप्त केली. गंगाझरी पोलिसांनी कोहका येथील ओमप्रकाश तिलचंद दमाहे (३६) याच्याकडून हातभट्टीची दोन लिटर दारू जप्त केली. तर शहर पोलिसांनी श्रीनगरातील रितेश सेवकराम बनकर (२७) याच्याकडून भिमनगरातून हातभट्टीची आठ लिटर दारू तसेच अंजोरा येथील लक्ष्मीकांत अशोक कांबळे (३०) याच्याकडून देशी दारूचे १० पव्वे पोलिसांनी जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी