लोकमत न्यूज नेटवर्करावणवाडी : गोंदिया तालुक्यातील दासगाव डांर्गोली येथील रेती घाटावरुन मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा सुरू आहे. मात्र यानंतरही रेतीमाफीयांवर कुठलीच कारवाई केली जात नसल्याने रेती माफीया महसूल विभागाच्या यंत्रणेवर वरचढ झाल्याचे चित्र आहे.दररोज मध्यरात्रीनंतर ट्रक, ट्रॅक्टरने रेतीची अवैध वाहतूक होते. त्यामुळे दासगाव व डांर्गोली परिसरातील रस्त्यांची सुध्दा दूरवस्था झाली आहे. रेतीमाफीयांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने गावकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे.रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे दुचाकी व इतर वाहन चालकांना या रस्त्यावरुन वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.काही दिवसांपूर्वी तहसीलदारांनी रेती माफीयांवर कारवाई केली होती. मात्र यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रेती माफीयांना नेमके कुणाचे पाठबळ आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे.जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी सुध्दा रेती माफीयांचे मुसके आवळण्यासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. पण यानंतरही रेतीचा अवैध उपसा करुन त्याची वाहतूक सुरूच असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी याकडे स्वत: लक्ष देऊन रेती माफीयांवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
रेतीघाटावरून रेतीचा अवैध उपसा सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 11:42 PM
गोंदिया तालुक्यातील दासगाव डांर्गोली येथील रेती घाटावरुन मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा सुरू आहे. मात्र यानंतरही रेतीमाफीयांवर कुठलीच कारवाई केली जात नसल्याने रेती माफीया महसूल विभागाच्या यंत्रणेवर वरचढ झाल्याचे चित्र आहे.
ठळक मुद्देमहसूल विभागाची डोळेझाक : लाखो रुपयांचा महसूल पाण्यात