शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
3
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
4
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
5
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
6
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
7
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
9
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
10
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
11
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
12
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
13
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
14
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
15
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
16
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
17
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
18
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
20
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक

कामठा-पांजरा रस्ता अपघाताला आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 9:37 PM

तालुक्यातील कामठा-आमगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या मार्गावरुन वाहन चालविताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्डयांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून मागील वर्षभरात या मार्गावर तिघांचा बळी गेला आहे.

ठळक मुद्देवर्षभरात तिघांचा बळी : सार्वजनिक बांधकाम विभागाची बघ्याची भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : तालुक्यातील कामठा-आमगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या मार्गावरुन वाहन चालविताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्डयांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून मागील वर्षभरात या मार्गावर तिघांचा बळी गेला आहे. मात्र कुंभकर्णी झोपेत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला अद्यापही जाग आली नसल्याने हा मार्ग अपघाताला आमंत्रण देत आहे.कामठा-आमगाव मार्गे भोषा ते पांजरा हा रस्ता खड्डयांमुळे गायब झाल्याचे चित्र आहे. डांबरीकरण केलेला रस्ता पूर्णपणे उखडला असल्याने या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या गावकºयांना सुध्दा त्रास सहन करावा लागत आहे. भोसा, किकरीपार, कट्टीपार, बनगाव, गणेश घाट या रस्त्यांची सुध्दा तिच स्थिती आहे. वर्षाभरात या ठिकाणी तीन अपघात झाले असून त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याच मार्गावरुन बालाघाट ते डोंगरगड, राजनांदगाव, रायपूर, भिलाई येथील प्रवासी प्रवास करतात. मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातील शेकडो दुचाकी, चारचाकी व जडवाहन या रस्त्यावरुन धावतात. मागील वर्षभरापासून अद्यापही या रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने आतातरी याची दखल घेवून रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी भोसा येथील सरपंच सुनील ब्राम्हणकर, सहकार चळवळीचे नेते सुखदेव ब्राम्हणकर, कालीमाटीचे सरपंच गजानन भूते, करंजीचे सरपंच डॉ. हंसराज चुटे, काँग्रेसचे नेते गणेश हुकरे, गणेश हर्षे, शंकर रहांगडाले, युवराज पटले, महेंद्र रहांगडाले, बंडू सोनवाने, अशोक खोब्रागडे, लोकचंद तरोणे, हुलसराम बहेकार, शंकर कुरंजेकर, योगेश्वर फरकुंडे, एकनाथ हत्तीमारे, सरिता बहेकार, संगिता फुंडे, मनिषा मटाले, कांता मटाले, वच्छला बागडे, देवानंद डोंगरे, योगेश चुटे, धनिराम मरस्कोल्हे, हेमंत तावाडे, पारबता भांडारकर, पारबता हेमणे, ललीता लांजेवार, केशर फुंडे यांनी केली आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदारकामठा ते आमगाव या रस्त्याच्या देखभाल दुरूस्तीचे जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. मात्र या विभागाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे रस्त्याची पूर्णपणे वाट लागली आहे. गावकऱ्यांनी याबाबत ची तक्रार केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदाराला पत्र देऊन मोकळे होण्यातच धन्यता मानली. त्यामुळे रस्त्याची समस्या कायम आहे.